• Mon. May 5th, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

Byjantaadmin

Oct 28, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून

परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध

       लातूर, दि. 28 (विमाका):-  महाराष्ट्र   लोकसेवा आयोगाकडून 2023 मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे  आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

          शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. तरी संबंधित संस्थांनी  परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याची विनंती  संस्थांना आयोगाने केल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *