• Wed. Apr 30th, 2025

अल्पसंख्यांक समाजाच्या अर्थकारणावर आघात करण्याचे भाजपचे षडयंत्र : खासदार इम्रान प्रतापगढी

Byjantaadmin

Jun 5, 2023

कृषी पाठोपाठ यंत्रमाग व्यवसाय देशात सर्वाधिक रोजगार निर्मिती करतो. मुस्लीम समाज बांधवांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर या व्यवसायावर अवलंबून आहे. काँग्रेस सरकारच्या काळात यंत्रमाग कारखानदारांना तीस टक्के अनुदान होते. केंद्रातील भाजपने ते दहा टक्क्यांवर आणले. चार महिन्यांपासून अनुदानही मिळत नाही. यातून अल्पसंख्यांक समाजाच्या अर्थकारणावर आघात करण्याचे भाजपचे षडयंत्र आहे. आपण याप्रश्‍नी आवाज उठवू. मतदारांनी कॉंग्रेसला साथ द्यावी असे, आवाहन खासदार इम्रान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांनी येथे केले

Imran Pratapgadi News

येथील अन्सार जमात खान्याच्या प्रांगणात ‘भारत जोडो’ बुनकर संमेलनानिमित्त झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अनिस अहमद, वजहात मिर्झा, अनवार अहमद, नसीम अहमद, नासिर खान, इब्राहिम खान, हाजी बब्बू खान, तारीख फारुखी, निजामुद्दीन राहीन, मिल्लत रहमानी, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग, अब्दुल रहमान, डॉ. मंजूर हसन अय्युबी, सुलतान शेख, जमील क्रांती आदी व्यासपीठावर होते.

खासदार प्रतापगढी म्हणाले, की BJP हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करुन द्वेषाचे राजकारण करीत आहे. याउलट RAHUL GANDHI यांनी चार हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्‍मिर पदयात्रा काढून भारत जोडो-नफरत छोडो हा संदेश दिला. त्याची परिणीती कर्नाटकमधील निवडणुकीत दिसून आली. आगामी काळात मध्यप्रदेश व महाराष्ट्रमध्ये कर्नाटकची पुनरावृत्ती होईल. CONGRESS अल्पसंख्यांक समाजबांधवांना सन्मान दिला, असे मत व्यक्त करतानाच त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खासदार बनविले. अनेक अल्पसंख्यांक नेत्यांना राष्ट्रपती, मुख्यमंत्री केले असे सांगितले. त्यांनी हाफीज साजिद अश्रफी व मौलाना अब्दुल अहाद अजहरी यांच्या नावाने वाचनालय सुरू करण्याची घोषणा केली.

माजी मंत्री अनिस अहमद यांनी आपण नागपूर व औरंगाबाद येथे हज सेंटर सुरू केले. वैद्यकीय व उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पन्नास हजार शिष्यवृत्ती दिली. कब्रस्तानसाठी दहा लाख रुपये निधी दिला. राज्यात बर्ड फ्लूच्या वेळेस शंभर कोटीची मदत दिली. औरंगाबाद व नागपूरहून हजला जाणाऱ्या भाविकांकडून मुंबईपेक्षा ऐंशी हजार रुपये जास्त घेतले जातात. ते बंद करावे यावेळी बेग यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *