• Wed. Apr 30th, 2025

कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात चार ठार

Byjantaadmin

Jun 4, 2023

चंद्रपूर : नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक चौघेही नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Four killed in accident Chandrapur

कारमधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी व महिला गंभीर जखमी झालेली आहे. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. मृत दोन महिला व दोन पुरुष अजूनही कारमध्ये फसून आहेत. घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. कार कापून मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. चारही मृतक नागपूरचे आहेत. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *