निलंगा विधानसभा मतदार संघातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो अभियानात सामील होणारअशोकराव पाटील निलंगेकर
निलंगा- निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा शिरूर अनंतपाळ,देवणी तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक फार्मसि महाविद्यालयाच्या सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश मानवधिकार लीगल सेल चे अध्यक्ष ऍड.रविप्रकाश जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,मा.राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते कश्मीर राष्ट्रीय एकात्मता व एकता,अखंडता अबाधीत राहण्यासाठी हम सबके सब हमारे व देशातील तरूणाई ची बेकारी,वाढती महागाई दूर करण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू केलेली आहे.या अभियानात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी सभा चालू असताना सभेमध्ये अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मोबाईलवर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्राचे प्रमुख यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना नांदेड व देगलूर येथे भारत जोडो अभियानात येण्याचे आमंत्रण दिले.ते पुढे बोलताना म्हणाले की,देशाच्या काँग्रेस उभारणीत डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा सिंहाचा वाटा असून काँग्रेस मजबुती साठी अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आव्हान केले.त्यांच्या आव्हानाला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजरात प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके,मानवाधिकार लीगल सेलचे ऍड रविप्रकाश जाधव,तालुकाध्यक्ष विजय पाटील,मा.सभापती अजित माने,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे दयानंद चोपणे,संजय बिराजदार,यांनी भारत जोडो यात्रेसंबधी मार्गदर्शन केले. यात प्रामुख्याने उपस्थिती निलंगा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल सोनकांबळे,नगरसेवक सुधीर लखनगावे,ऍड,जगदीश सूर्यवंशी,ऍड तिरुपती शिंदे,युवक प्रदेश सरचिटणीस गजानन भोपणीकर, देविदास पतंगे,दिनकर नितुरे, गंगाधर चव्हाण,पडमसिंग पाटील,नाईकवाडे,अनिल पाटील,देवदत्त पाटील,मंगेश चव्हाण,नूर पटेल,सतीश कोणिरे,बालाजी शेळके,विकास पाटील,गुंडेराव बिराजदार,सुधाकर पाटील, असगर अन्सारी,लाला पटेल,अमित नित नवरे,सिराज देशमुख,प्रसाद झरकर,सुभाष पाटील,सुभाष नाईकवाडे,सोपान धुमाळ,दत्ता पाटील,अब्रार देशमुख,श्रीमंत बोलसुरे,पंडितराव भदरगे,तुराब शेख, सत्यप्रकाश होळीकर, लक्ष्मण बोधले,शकील पटेल, अरविंद कांबळे आदी सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शेळके व आभार प्रदर्शन ऍड तिरुपती शिंदे यांनी केले.