महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील पंढरपुरे व शिरुरे या विद्यार्थिनीची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
निलंगा-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उन्हाळी – २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयातून लक्ष्मी पंढरपूरे व हिंदी विषयातून योगिता शिरुरे या दोन विद्यार्थिनी गुणवत्ता यादीमध्ये सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नवीन विद्यापीठ कायद्यानुसार निमंत्रित सदस्य म्हणून लक्ष्मी पंढरपुरे व योगिता शिरुरे या दोन्ही विद्यार्थीनीची निवड विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र महाविद्यालयातील ११ विद्यार्थी उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत बी.ए., बी.कॉम.,बी. एस्सी., बी. सी. ए, बी. व्होक. शाखेतून विविध विषयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा बहुमान मिळवत व महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकले आहेत.
पंढरपुरे व शिरुरे यो दोन्ही विद्यार्थ्यींनीच्या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्था सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.