10 वी बोर्ड परीक्षेत जय भारत विद्यालयाचा 100%निकाल
निलंगा:-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयाचा 100 टक्के निकाल . परीक्षेस 196 विद्यार्थी प्रविष्ठ होते 196 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी कु. मुळे मनस्वी सुनिल 99.60 टक्के मिळवून विद्यालयातून प्रथम आली तर खलंग्रे सागर दयाराम 98.60 टक्के विद्यालयातून व्दितीय येण्याचा मान मिळवला तसेच विद्यालयातून तृतीय कु. सावळे अनुष्का गोविंद 98.00 टक्के. कु शिंदे नम्रता संजय 97.80 टक्के विद्यालयातून चौथी येण्याचा मान मिळवला. तसेच 57 विद्याथ्र्यांनी 90 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले, विशेष प्राविण्यात 150 विद्यार्थी आहेत. 33 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे 6 विद्यार्थी आहेत.
तरी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, प्राचार्य डॉ. राजेश्वर पाटील, उपप्राचार्य सुधाकर बिराजदार, पर्यवेक्षक दत्तात्रय पवार, प्राध्यापक व प्राध्यापिका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे हार्दिक अभिनंदन केले.