• Tue. Apr 29th, 2025

लातूर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला अन् झाला भांडाफोड…

Byjantaadmin

Jun 2, 2023

लातूर ;पोलिसांनी मोठी कारवाई करत घरात कुंटणखाना चालवणाऱ्या ‘आंटी’वर कारवाई केली आहे. लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे पोलिस पथकाने मध्यरात्री छापा मारत ही कारवाई केली आहे. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत एका आंटीला अटक केली असून, दोघा पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (1 जून) गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra NewsLatur News Aunty was running the Kuntankhana in the house The police sent dummy customer and filed a case Latur Crime :'आंटी' घरातच चालवत होती कुंटणखाना, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला अन् झाला भांडाफोड

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लातुरात एक महिला पैशाचे आमिष दाखवून बाहेरगावाहून महिलांना बोलावून घेत आपल्या राहत्या घरातच देहविक्री व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने एक डमी ग्राहक पाठवून घरातच सुरु असलेल्या कुंटणखान्याची खात्री केली. त्यानंतर या कुंटणखान्यावर अचानकपणे छापा मारला. यावेळी आंटीसह अन्य दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेत झाडाझडती घेतला. यावेळी पीडित महिलांनी सांगितले, की पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्री करुन घेतले जात आहे. त्यांनतर कुंटणखाना चालवणाऱ्या एका आंटीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम असा 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1959  कलम 3,4,5 प्रमाणे गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही कारवाई पोलीस नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक शिरसाट, मपोउपनि श्यामल देशमुख, पोह. सदानंद योगी, मोना सुधामती वंगे, लता गिरी, वाहन चालक बुडे यांच्या पथकाने केली. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक गोरख दिवे करीत आहेत.

पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला अन् झाला भांडाफोड 

गेल्या काही दिवसांपासून एक महिला लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरात देहविक्रीचा व्यवसाय करत होती. विशेष म्हणजे पैशाचे आमिष दाखवून बाहेरगावाहून महिलांना बोलावून घेत देहविक्रय व्यवसाय करण्यासाठी अंटी भाग पाडायची. दरम्यान याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी आधी डमी ग्राहक पाठवला. या डमी ग्राहकाने आतमध्ये जाऊन संपूर्ण खात्री करत पोलिसांना इशारा दिला. खात्री होताच पोलिसांच्या पथकाने अचानकपणे छापा मारत आंटीला ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed