मध्य रेल्वेच्या झोनल उपभोक्ता सल्लागार समितीवर निजाम शेख यांची निवड
आ.रमेशअप्पा कराड यांच्याकडून सत्कार
लातूर/प्रतिनिधी:रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या झोनल उपभोक्ता सल्लागार समितीवर निजाम शेख यांची सलग चौथ्या वेळी निवड केली आहे.याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड यांनी सामाजिक कार्यकर्ते निजाम शेख यांचा सत्कार केला.खा.सुधाकरराव शृंगारे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे कार्यकर्ते असणारे निजाम शेख यांची मुंडे यांच्याच शिफारशीवरून मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक या तीन राज्यांच्या झोनल सल्लागार समितीवर पहिल्या वेळी निवड झाली होती.मिळालेल्या संधीचा वापर करत शेख यांनी रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या.प्रवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले.या कामाची दखल घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांची फेरनिवड केली.
याबद्दल आ.रमेशअप्पा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा येथे एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.खा.शृंगारे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी शाल,पुष्पहार घालून शेख यांना सन्मानित करण्यात आले.
लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी आपल्या सदस्यपदाचा वापर व्हावा,अशी अपेक्षा आ.कराड व खा.शृंगारे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
या निवडीबद्दल रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील,मंत्री सुधीर मुनगुंटीवार,माजी मंत्री पंकजाताई मुंडे,खा.प्रीतमताई मुंडे यांनीही निजाम शेख यांचे अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, तालुकाध्यक्ष ॲड.दशरथ सरवदे, संगायोचे अध्यक्ष वसंत करमुडे, प्रदेश भाजपाचे सतिष आंबेकर, अमर वाघमारे,श्रीकृष्ण पवार, दर्जी बोरगावचे सरपंच रमेश कटके,आरजखेड्याचे उपसरपंच भालचंद्र सूर्यवंशी,इंदरठाणा येथील कल्याण मजूर संस्थेचे चेअरमन सय्यद वाजिद सालारसाब,सरपंच अविनाश रणदिवे,उपसरपंच इब्राहिम सय्यद सय्यद गफूर,भगवान बैरागी,कबीर जोगदंड,अलीम सय्यद , सुग्रीव कटके, गोकुळ सुरवसे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.