मुंबई : 19 जून हा (Shivsena Anniversary) दिन. यंदा मात्र शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे करणार आहेत. शिवसेनेचे आमदार आणि नेते यासाठी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे, यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश (Uddhav Thackeray) यांनी याआधीच त्यांच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. शिवसेनेच्या इतिहासांत पहिल्यांदा असे दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत.
ठाकरे आणि शिंदे गट तयारीला
उद्धव ठाकरे यांच्याशी (Eknath Shinde) यांनी काडीमोड घेतला आणि शिवसेनेची सर्वच गणितं बदलून गेली. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो याच शिवसेनेचा येत्या 19 जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकानाथ शिंदे आणि त्यांचे आमदार देखील या वर्धापन दिनाच्या तयारीला लागले आहेत.
इतिहासांत पहिल्यांदा दोन वर्धापन दिन
गेल्या वर्षी दसरा मेळावादेखील दोन झाले होते उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा हा बीकेसीवर पार पडला होता. ठाकरेंनी यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव साजरा करायचा असल्याचे आदेश याआधीच आपल्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत त्यामुळे आता दोन्ही बाजूने या वर्धापन दिनाच्या तयारी सुरु झाली आहे.
षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार
सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानंतर ठाकरे गटातील बैठकांचे सत्र सुरुच आहे. 18 जूनला मुंबईत राज्य आणि राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रमुख म्हणून फेरनिवड होण्याची शक्यता आहे. कायदेतज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरवले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना राष्ट्रीय, राज्य कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी तालुका पातळीपासूनच्या सुमारे तीन-साडेतीन हजार प्रमुख पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा केंद्रांत ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे.