नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाली. यावेळी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी २०१४ पासून “inclusive growth”
अंतर्गत विविध क्षेत्रांत व्यापक बदल घडवून आणले असल्याचे सांगितले.रेल्वे, हवाई आणि रस्ते, पायाभूत सुविधा या “अपरिवर्तनीय सक्षमीकरण”सह कोविड लस आणि रेशनचा समावेश आहे, असल्याचंही नड्डा म्हणाले.पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले की, पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या तीन देशांच्या दौऱ्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.दरम्यान, एकीकडे भाजपा आपल्या सत्तेची नऊ वर्षे साजरी करत असताना काँग्रेसने त्यांना नऊ प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारच्या कथित अपयशाची रुपरेषा देणारी ३१ पानांची पुस्तिकाच जारी केली आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची पंतप्रधानांनी उत्तरे द्यावीत, अशी आमची इच्छा आहे,” असे काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले. कॉंग्रेसने ब्रीफिंगमध्ये “9 साल 9 सावल” (9 वर्षे 9 प्रश्न) नावाचा एक पुस्तिका जारी केली, ज्यामध्ये प्रश्नांची यादी केली आहे. अर्थव्यवस्था, भ्रष्टाचार, कोविड -19 आणि सामाजिक न्याय आदी विविध मुद्द्यांवर हे प्रश्न विचारण्यात आले.पुढच्या तीन दिवसात काँग्रेसकडून मीडिया ब्लिट्झ करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.