देशभरात लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या मध्ये महाराष्ट्रात देखील मविआ आणि भाजप-शिवसेनेने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे. तर काँग्रेसची २ आणि ३ जून रोजी मुंबईत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक पार पडणार आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्यातील ४८ loksabha मतदारसंघात काँग्रेसची चाचपणी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसची २ आणि ३ जून रोजी मुंबईत बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.२ आणि ३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत सर्व लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडे असलेल्या मतदारसंघातही काँग्रेस चाचपणी करणार आहे.राज्यातील ४८ loksabha मतदारसंघातील उमेदवारांच्या चाचपणीसाठी काँग्रेसची बैठक होत आहे. ही बैठकीत लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, आमदार, प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.दरम्यान मविआमध्ये अजून जागा वाटपावर कोणताही निर्णय झाला नाही. मात्र ४८ लोकसभा मतदारसंघावर जागा वाटपात मविआच्या प्रमुख नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या यांच्या जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. भाजप २६ आणि शिवसेना २२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते.