लोकनेते श्रेध्देय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रेणा कारखाना साईटवरील स्मृती संग्रहालय स्थळी अभिवादन व विविध कार्यक्रम संपन्न
दिलीप नगर, निवाडा :– लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचे जिल्हयातील सर्व शेतकऱ्यावर असलेले प्रेम व त्यांचे उत्पन्न वाढीसाठी श्रध्देय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने त्यांना ऊस उत्पादन वाढीमध्ये सतत पडणारा पाऊस,रोग, वातावरण इत्यादी अडचणीचा सामना करावा लागत आहे. यावर त्यांना सखोल मार्गदर्शन व्हावे यासाठी कारखान्याचे वतीने बोकनगांव, खलंग्री व पानगांव येथे तसेच कारखाना साईटवर वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट, मांजरी यांचे तज्ञ शास्त्रज्ञ डॉ.श्री.हापसे साहेब व डॉ.श्री.पवार साहेब यांचे प्रमुख मार्गदर्शनात ऊस पिक खोडवा व्यवस्थापन परिसंवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच रेणा कारखानासाईटवरील स्मृती संग्रहालय स्थळी लोकनेते श्रेध्देय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त रेणा कारखाना परीवाराच्यावतीने पूर्णाकृती पुतळ्यास आदरांजली वाहण्यात आली तदनंतर लगेच ऊस पिक खोडवा व्यवस्थापन परिसंवाद मेळावा घेण्यात आला नंतर पर्यावरण संतुलन राखणेस मदत होण्याच्यादृष्टीने कारखाना साईटवर वृक्षारोपन करण्यात आले.सदर कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन श्री.सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन श्री.अनंतराव देशमुख,संचालक श्री. त्र्यंबकराव भिसे, श्री.यशवंतराव पाटील, श्री.संग्राम माटेकर,श्री.प्रेमनाथ आकनगिरे,श्री.श्री.संजय हरिदास,श्री.प्रविण पाटील,श्री अनील कुटवाड,श्री.शहाजी हाके, श्री.तानाजी कांबळे,श्री. स्नेहलराव देशमुख,कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बी. व्ही.मोरे,मुख्य शेतकी अधिकारी श्री.शिवाजी
भोसले,कृषी उत्पन्न बाजार समीती,रेणापूर नुतन सभापती श्री.उमाकांत खलंग्रे, उपसभापती श्री.शेषेराव हाके, महीला कॉग्रेस तालुकाध्यक्षा सौ.पुजा इगे, सौ. इंदुबाई इगे, प्रविण माने,अमर वाकडे,नागनाथ कराड,विश्वनाथ कागले, राजाभाऊ साळुंके,शिखंडी हरवाडीकर कॉग्रेस कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमचे प्रास्तावीक कारखान्याचे चेअरमन श्री.सर्जेराव मोरे यांनी केले व आभार कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. अनिल कुटवाड यांनी केले.