• Thu. May 1st, 2025

जय भारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12 वी चा 97.02% निकाल

Byjantaadmin

May 25, 2023

जय भारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा 12 वी चा 97.02% निकाल
निलंगा:-जय भारत उच्च माध्यमिक विद्यालय दापका येथील विज्ञान शाखेत 487 विध्यार्थानी परीक्षा दिली असून 476 विद्यार्थी उतीर्ण असून, विशेष प्राविण्यामध्ये 209 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 237 विद्यार्थी उत्तीर्ण असून विज्ञान शाखेचा निकाल 97.17 टक्के विज्ञान शाखेतून प्रथम शिंदे तनुजा शंकर 92.17 टक्के व्दितील बरमदे उदयराजे बालाजी 89.33 टक्के व तृत्तीय घाडगे सुमीत संतोष 88.83 टक्के.
कला शाखेतून 186 विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली असून 177 विद्यार्थी उत्तीर्ण, कला शाखेचा निाकल 95.16 टक्के प्रथम पोतदार अंजली अनिल 90.33 टक्के व्दितीय लाळे प्रिती बिभीषण 85.33 टक्के तृतीय कागे वैष्णवी ज्ञानेश्वर 82.83 टक्के तसेच वाणिज्य शाखेतून 166 विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली असून 161 विद्यार्थी उत्तीर्ण झाले वाणिज्य शाखेचा निकाल 96.98 टक्के प्रथम पाटील स्वाती धनराज 87.67 टक्के व्दितीय सागावे भूमिका माधव 87.50 टक्के व तृतीय आनंदवाडे शुभांगी संभाजी 85.67 टक्के.
जय भारत उच्च माध्यमिक विद्यालयातून एकूण 839 विथार्थानी परीक्षा दिली असून 263 विशेष प्राविण्य व प्रथम श्रेणीत 437 व व्दितीय श्रेणी 107 व उत्तीर्ण 7 विद्यार्थी आहेत उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.02% लागला.
तरी संस्थेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, प्राचार्य डॉ. राजेश्वर पाटील, उपप्राचार्य सुधाकर बिराजदार, पर्यवेक्षक दत्तात्रय पवार, प्राध्यापक व प्राध्यापिका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्याथ्र्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *