• Tue. Apr 29th, 2025

सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची  ओळख निर्माण करु -बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आश्वासन

Byjantaadmin

Sep 23, 2022

सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास कोऑपरेटीव्ह बँकेची  ओळख निर्माण करु  
बँकेच्या २१ व्या अधिमंडळाच्या सभेत

बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले आश्वासन

 अग्रगण्य नागरी बँक म्हणून नावावर रूपाला आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

 अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ आणि जलद सेवा उपलब्ध केल्या जातील.

 सर्वसामान्यांची बँक म्हणून विलास को-ऑपरेटिव बँक ओळखली जावी

 शेतकरी, आणि मजूरही उद्योजक म्हणून ओळखले जावेत

 शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरमध्ये बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज योजना

लातूर  प्रतिनिधी :विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उदयास आलेली विलास को ऑपरेटीव्ह बँक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख  यांनी योग्य नियोजन आणि कडक शिस्तीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात जो आदर्श निर्माण केला आहे, त्याचे अनुकरण करुन या बँकेतून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे काम घडेल, अशी ग्वाही देताना बँकेचे चेअरमन, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ही बँक सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखली जावी यासाठी सदैव जागरुकता दाखवली जाईल, असे आश्वासन दिले़.

शेतकरी, मजूर, लहान व्यावसायिक, लघुउद्योगजक, यांना वेळेत पतपुरवठा  करुन त्यांच्या जीवनात आर्थिक बदल घडवण्याचा उद्देश ठेऊन स्थापना झालेल्या विलास को-ऑपरेटीव्ह बँकेची २१ वी अधिमंडळाची वार्षिक सभा दि़. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथील रिंग रोडवरील स्वानंद बॅक्वेट हॉलमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बँकेचे चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली़. त्यावेळी त्यानी उपरोक्त आश्वासन दिले़.

या सभेस माजी आमदार वैजनाथराव शिंदे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशोक गोविंदपूरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनंजय देशमुख, बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत देवकते, बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत कातळे, सदस्य ॲड़. किरण जाधव, ॲड़. समद पटेल, रमेश थोरमोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र सपाटे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed