• Thu. May 1st, 2025

महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100 % निकाल

Byjantaadmin

May 25, 2023
महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100 % निकाल
निलंगा- महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, निलंगा येथील इ. १२ वी बोर्ड फेब्रु/मार्च 2023  परीक्षा निकाल नुकताच जाहीर झालेला असून विज्ञान शाखा 100%,  कला शाखा 92.63%, वाणिज्य शाखा 99.25% , एमसीव्हीसी 90.00%  शाखानिहाय निकाल लागला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विज्ञान, वाणिज्य, कला व एमसीव्हीसी शाखेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
विज्ञान शाखेतून वैभवी गरीबसे या विद्यार्थीनीने 87.17 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच अक्षता बिराजदार 86.17 टक्के गुण घेऊन द्वितीय व राजश्री ब-हाणपुरे 85.83 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
वाणिज्य शाखेतून वैभवी माळी या विद्यार्थीनीने 89.00 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच समृध्दी निलंगेकर 86.67 टक्के गुण घेऊन द्वितीय व प्रतिक्षा मोहिते 85.67 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कला शाखेतून श्रुती जाधव या विद्यार्थीनीने 87.33 टक्के घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच वैष्णवी चेळकर 87.17 टक्के गुण घेऊन द्वितीय व मोनिका सोमवंशी 86.17 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
एमसीव्हीसी शाखेतून आश्विनी माने या विद्यार्थीनीने 74.67 टक्के गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच पुजा डांगे 70.67 टक्के गुण घेऊन द्वितीय व गवळण बिराजदार 67.33 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय पाटील निलंगेकर, संस्था सचिव बाब्रूवान सरतापे, संस्था समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. राजेंद्र कटके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *