लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या जयंती निमित्त मांजरा कारखाना येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
विलासनगर:– सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणून विकास साधणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या २६ मे २०२३ जयंती निमित्ताने विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे
सकाळी ७.३०वाजता कारखाना साइटवर माननीय साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पांजली अर्पण केली जाईल, त्यानंतर साडेनऊ वाजता केवळ कारखान्यातील कामगारांसाठी सर्व रोग निदान व नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ७.३० वाजता मातोश्री वृद्धाश्रमातील आजी- आजोबांना कारखाना साइटवर स्नेहभोजन ठेवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे व्हा चेअरमन श्रीशैल उटगे,सर्व संचालक व कार्यकारी संचालक पंडित देसाई यांनी दिली आहे.