• Fri. May 2nd, 2025

एसटी आणि ट्रक भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 13 जखमी

Byjantaadmin

May 23, 2023

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजिक ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.या भीषण अपघातात एकूण मृतकांची संख्या 8 झाली असून 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

अपघातात (Accident) जखमी झालेल्या लोकंना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या (Washim) दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी 6च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *