• Sat. May 3rd, 2025

नोटबंदीमुळे 50 खोकेवाले हैराण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे 2 हजारांच्या नोटा बदलून देण्याचा…

Byjantaadmin

May 21, 2023

शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

मोदींसाठी फासाचा दौर पाठवावा का?

संजय राऊत म्हणाले, सामान्य माणसाकडे 2 हजारांच्या नोटा नाहीत. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली पहिली नोटबंदी फसली. त्यानंतर आता दुसरी नोटबंदीही फसली आहे. पहिली नोटबंदी फसली तर मला भरचौकात जाहीर फाशी द्या, असे मोदी म्हणाले होते. आता फासाचा दोर आम्ही तुम्हाला पाठवावा का?, याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावे.

नोटबंदीचा काहीच फायदा नाही

संजय राऊत म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्यांचे कंबरडे मोडेल, भ्रष्टाचार कमी होईल, काळा पैसा कमी होईल, असे अनेक दावे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. आता या निर्णयाला 6 वर्षे झाले आहेत. दहशतवाद कमी झाला आहे? आज मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यातील स्थिती पाहा, तेथे दहशतवाद वाढला आहे.

मोदी प्रायश्चित्त घेणार का?

संजय राऊत म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी खोटे बोलले आहेत. नोटबंदीमुळे साडेतीन ते चार हजार लोक बँकांच्या रांगात मरण पावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे प्रायश्चित्त घेणार आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादचे दुकान किंवा सुरतमधील कपड्याचे दुकान चालवत नाहीत, तर देश चालवत आहेत, याचे भान तरी त्यांनी ठेवावे, असा टोला राऊतांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *