छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या लातूर शहरात उभारण्यात आलेल्या पुतळयाचे त्वरीत लोकार्पण करण्या संदर्भात कार्यवाही करावी -माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी : लातूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाचे निवडणूका होण्याची वाट न पाहता त्वरीत लोकार्पण करण्या संदर्भात कार्यवाही करावी, अशी सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महानगरपालीका आयुक्त यांना पत्राव्दारे केली आहे. लातूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाचे त्वरीत लोकार्पन व्हावे म्हणून पुर्वभाग कृतीसमितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. समितीचे हे आंदोलन कौतुकास्पद असल्याचे नमूद करून काम पूर्ण झालेनंतर खुप दिवसा पर्यंत महापुरूषांच्या पुतळयांचे अनावरण प्रलंबीत ठेवणे योग्य नसल्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. सदरील पुतळाचे लोकार्पन करण्या संदर्भात यापुर्वी आापण सुचना दिल्या आहेत, मात्र त्यावर गतीने कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळेच जनतेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. लातूर महानगरपालीकेतील लोकनियुक्त पदाधिकारी यांची मुदत संपली असल्यामुळे तेथे आयुक्ताच्या नियंत्रणात प्रशासकीय कामकाज चालू आहे. निवडणूका होऊन लोकनियुक्त पदाधिकारी आल्यानंतर छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाचे लोकार्पन करावे, असा विचार आयुक्ताचा असू शकतो मात्र विविध कारणाने निवडणूका लाबणीवर पडत महाराज यांच्या पुतळयाचे त्वरीत लोकार्पन करण्या संदर्भात कार्यवाही करावी, अशी विनंतीवजा सुचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महानगरपालीका आयुक्त यांना पत्र पाठवून केली आहे.
काँग्रेस शिष्टमंडळाकडून उपायुक्त शिवाजी गवळी यांनी पत्र स्वीकारले लातूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे त्वरित लोकार्पण करावे, अशी विनंती वजा सूचना करणारे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे पत्र, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी शिष्टमंडळासह लातूर महापालिकेत जाऊन आयुक्तांकडे सुपूर्द केले, महापालिका उपायुक्त श्री गवळी यांनी काँग्रेस सिस्टिम मंडळाकडून हे पत्र स्वीकारले या शिष्टमंडळात शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, माजी उपमहापौर कैलास कांबळे, तसेच राजाभाऊ माने, यशपाल कांबळे, बाबा पठाण, पिराजी साठे, अभिजित इगे, आदींचा समावेशहोता.