• Mon. May 5th, 2025

आमदारांना फोन करुन मंत्रिपद देतो म्हणून सांगायचा अन् लाखो रुपये उकळायचा; आरोपी अटकेत

Byjantaadmin

May 17, 2023

(Maharashtra Crime) काही आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) अटक केली आहे. नीरज सिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला (Gujrat News) (Morbi) अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांच्या नावाचा गैरवापर करत होता.

Neeraj Singh Rathore arrested in Gujarat for looting MLAs by accepting bribe Maharashtra Nagpur Crime Maharashtra Nagpur Crime: आमदारांना फोन करुन मंत्रिपद देतो म्हणून सांगायचा अन् लाखो रुपये उकळायचा; आरोपी अटकेत

गेल्या काही दिवसांत आरोपीनं काही भाजप (BJP) आमदारांना फोन केले होते. आपण नड्डांच्या जवळचे आहोत, असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा त्याचा प्रयत्न होता. काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे. मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.

दरम्यान नागपूर मध्यचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या भामट्यानं सात मे रोजी संपर्क साधला होता. कुंभारेंना संशय आला, आणि त्यांनी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. अशी कुठलीही व्यक्ती नड्डांच्या जवळची नाही, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत याप्रकरणी लेखी तक्रार दिली.

प्रकरण नेमकं काय? 

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होईल हे जरी स्पष्ट नसलं, तरी राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देतो, असं आमिष दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आमदारांना मंत्रीपद मिळवून देण्याचा आमिष दाखवणारा भामटा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं नाव घेऊन अशी फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून काल (16 मे) रात्री उशिरा ताब्यात घेतलं असून त्याचं नाव नीरज सिंह राठोड आहे. त्यानं गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भाजप आमदारांना संपर्क साधून तो भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या जवळचा असल्याची बतावणी केली आणि महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असं सांगून कोट्यवधी रुपयांची मागणीही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *