कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे प्रतिष्ठाण अशोक चिंचोले यांना पत्रकारिता, सद्भावना पुरस्कार
लातूर ः कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या नांवे असलेल्या स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने दिनांक 18 व 19 मे रोजी केज तालुक्यातील उंदरी येथे विविध उपक्रम तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोबतच निमंत्रितांचे कृषी कवी संमेलन ही होणार आहे. या सर्व कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे (पाटील) आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे (पाटील) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विद्यार्थीप्रिय दिवंगत प्राचार्य कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे-पाटील यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त काव्यसंध्या हे निमंत्रितांचे कृषी कवी संमेलन 18 मे गुरूवार रोजी सायंकाळी 7.15 वाजता उंदरी (ता.केज) येथे होणार आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदेव वाकुरे (सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, कोल्हापूर) तर उद्घाटक म्हणून युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, मार्गदर्शक म्हणून ॠषिकेश आडसकर (उपसभापती, पंचायत समिती, केज) आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नरेंद्र काळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दंत परिषद), शरद झाडके (उपजिल्हाधिकारी, अंबाजोगाई) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कृषी कविसंमेलनाचे समन्वयक कवी जनार्धन सोनवणे (केज), तर निमंत्रक कवयित्री सौ.अनुराधा सुर्यवंशी – ठोंबरे (लातूर) हे असून कविसंमेलनाचे सुत्रसंचालन कवी राजेश रेवले नैकोटेकर (सोनपेठ) हे करणार आहेत. कवी संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार डॉ.मुकुंद राजपंखे (अंबाजोगाई), राजेंद्र रापतवार (अंबाजोगाई), गोरख शेंद्रे (अंबाजोगाई), प्रा.हानुमंत सौदागर (केज), रंगनाथ काकडे (बनसारोळा), पांडुरंग वागतकर (परभणी) हे मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. तसेच 19 मे शुक्रवार रोजी सकाळी ठिक 9.50 वाजता वृक्ष पुजन व संवर्धन करण्यात येवून सकाळी 10 वाजता नियोजित कार्यक्रमास सुरूवात होईल. उंदरी (ता.केज) येथील कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती भवन येथे आठव्या पुण्यस्मरणानिमित्त पुरस्कार वितरण व शेतकरी मेळावा देखिल आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार सतीश भाऊ चव्हाण (सदस्य, विधान परिषद तथा कार्यकारी परिषद, वनामकृवि, परभणी) हे करणार असून या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा (केज विधानसभा मतदारसंघ, जि.बीड) या लाभणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.इंद्र मणी (कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.किशनराव गोरे (माजी कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी), ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रमेशराव आडसकर, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य राहुल सोनवणे (पाटील), अंकुशराव शिंदे-भापोसे (पोलिस आयुक्त, नाशिक), दिलीपराव स्वामी – भाप्रसे (मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर), डॉ.दिनकर जाधव (विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर विभाग) या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या सहा मान्यवरांना कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे (पाटील) स्मृती पुरस्कार तर अन्य दोन जणांना स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे – पाटील व स्व. सौ. राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे – पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कार प्राप्त मान्यवरांत जागतिक पखावज वादक पंडित उध्दव शंकरबापू आपेगावकर, अबाजोगाई
(कला, संस्कृती व सामाजिक पुरस्कार), आदर्श शिक्षक देविदासराव तुळशीराम कुटवाड, रेणापूर (भक्त पुंडलिक पुरस्कार), ज्येष्ठ पत्रकार राम प्रभाकरराव कुलकर्णी, धारूर (आदर्श बंधू भरत पुरस्कार), ज्येष्ठ संपादक अशोकराव चिंचोले, लातूर (पत्रकारिता व सद्भावना पुरस्कार), डॉ.अमित अगतराव लोमटे, अंबाजोगाई (वैद्यकीय सेवा व कोरोना योध्दा पुरस्कार), सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व युवा उद्योजक प्रदीप मधुकरराव ठोंबरे, केज (उंदरी ग्रामभूषण पुरस्कार) तसेच स्व.माणिकराव दादासाहेब ठोंबरे – पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवराम जयराम घोडके (बीड) यांना (कुशल कारभारी किसान पुरस्कार) व स्व.सौ.राणीलक्ष्मीबाई दादासाहेब ठोंबरे – पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ.मोहिनी सुधाकरराव देशमुख (अंबाजोगाई) यांना (कुशल कारभारीन किसान पुरस्कार) यांचा समावेश आहे. 18 व 19 मे या दोन्ही दिवशी कर्मयोगी डॉ.बालासाहेब ठोंबरे पाटील स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांसाठी केज, अंबाजोगाई तालुका आणि लातूर व बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती प्रभावती बालासाहेब ठोंबरे (पाटील) आणि जनार्धनराव दादासाहेब ठोंबरे (पाटील) यांच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उंदरी (ता.केज) येथील समस्त गांवकरी, माजी कृषी विद्यार्थी संघ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथील मित्र परिवार आदिंनी पुढाकार घेतला आहे.
कर्मयोगी डॉ. बालासाहेब ठोंबरे प्रतिष्ठाण अशोक चिंचोले यांना पत्रकारिता, सद्भावना पुरस्कार
