कर्नाटक विधानसभेत यंदा ९ मुस्लिम आमदारांची एन्ट्री
बंगरुळू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यावेळी कॉंग्रसकडून १५, जनता दल (धर्मनिरपेक्ष)कडून २१, आपकडून १५ तर एमआयएमकडून एक मुस्लिम उमेदवार रिंगणार होता. भाजपने एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते.
कर्नाटक विधानसभेत यंदा एकूण ९ मुस्लिम आमदारांची एन्ट्री झाली आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ७ मुस्लिम आमदार निवडून आले होते. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन मुस्लिम आमदारांची संख्या वाढली आहे. या निवडणुकीत कॉंग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांकडून मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. १९७८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे १६ मुस्लिम आमदार निवडून आले होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यावेळी कॉंग्रसकडून १५, जनता दल (धर्मनिरपेक्ष)कडून २१ तर आम आदमी पार्टीकडून १५ मुस्लिम उमेदवार रिंगणात होते. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाकडून (SDPI) ११ तर एमआयएम पक्षाकडून फक्त एक मुस्लिम उमेदवार रिंगणार होता. कर्नाटकात १३ टक्के मुस्लिम लोकसंख्या असून राज्यातील एकूण २२४ मतदारसंघापैकी १९ मतदारसंघांमध्ये ३० टक्के पेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत. तरी पण भाजप ने येथे एक ही मुस्लिम उमेदवार दिला नाही .भाजपा कडे मुस्लिम समाजातील नेते असताना सुध्दा डावलण्यात आलं यामागे राजकीय गणितं असू शकतं.
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे १६५, भाजपचे ६६ तर जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे १९ उमेदवार निवडून आले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले मुस्लिम उमेदवार
१) रिझवान अर्शद (शिवाजीनगर बेंगळुरु)
बंगळुरू शहरात मधोमध असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून कॉंग्रेसचे रिझवान अर्शद हे २३,१९३ मतांनी निवडून आले. रिझवान यांना ६४,९१३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार एन. चंद्रा यांना ४१,७१९ मते मिळाली आहे. २०१९ साली कॉंग्रेस आमदार रोशन बेग भाजपमध्ये सामील झाल्यानंतर या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत रिझवान अर्शद हे पहिल्यांदा आमदार झाले होते.
२) कनिझ फातिमा (गुलबर्गा -उत्तर)
गुलबर्गा (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवार कनिज फातिमा या २,७१२ मतांनी विजयी झाल्या. फातिमा यांना ८०,९७३ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांना ७८,२६१ मते मिळाली आहे. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत फातिमा यांचे पती कमर उल इस्लाम या मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले होते. ते कर्नाटक मंत्रिमंडळ मध्ये नगरविकास खात्याचे मंत्री होते.त्यांच्या मृत्युनंतर २०१८ च्या निवडणुकीत कनिझ फातिमा या पहिल्यांदा आमदार झाल्या म्हणून निवडून आल्या होत्या. कनिझ फातिमा या कर्नाटक विधानसभेत निवडून गेलेल्या एकमेव मुस्लिम महिला आमदार आहेत. कनिझ फातिमा यांचे पती स्व.कमर उल इस्लाम हे यांचा कर्नाटकच्या राजकारणात मोठे नावं होतं.
३) आसिफ सैत (बेळगाव -उत्तर)
कॉंग्रेस उमेदवार आसिफ सैत हे बेळगाव (उत्तर) विधानसभा मतदारसंघातून ४,२३१ मतांनी निवडून आले. सैत यांना ६९,१८४ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार डॉ. रवी पाटील यांना ६४,९५३ मते मिळाली. या मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळुरकर यांना ११,७४३ मते मिळाली.
४) तन्विर सैत (नरसिंहराजा)
कॉंग्रेस उमेदवार तन्विर सैत हे मैसूर जिल्ह्यातील नरसिंहराजा विधानसभा मतदारसंघातून ३१,१२० मतांनी निवडून आले आहे. सैत हे यंदा सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे. तन्विर सैत यांना ८३,४८० मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सतीश स्वामी यांना ५२,३६० मते मिळाली आहे.
५) रहिम खान (बिदर)
बिदर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस उमेदवार रहिम खान १०,७८० मतांनी विजयी झाले. खान यांना ६९,१६५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे उमेदवार सूर्यकांत नगरमपल्ली यांना ५८,३८५ मते मिळाली. भाजपचे ईश्वर ठाकूर यांना १७,७७९ मते मिळाली.या पूर्वी रहीम खान येतून निवडुन आले होते.
६) एन ए हारीस (शांतीनगर, बेंगळुरू)
N A अहमद हारीस हे बंगळुरू शहरांतर्गत येणाऱ्या शांतीनगर विधानसभा मतदारसंघातून ७,१२५ मतांनी निवडून आले. हारीस यांना ६१,०३० मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार के. शिवकुमार यांना ५३,९०५ मते मिळाली आहे.
७) इकबाल हुसेन (रामनगर)
जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा पारंपरिक गड मानले जाणाऱ्या रामनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या इकबाल हुसेन यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे उमेदवार, कन्नड चित्रपट अभिनेते निखिल कुमारस्वामी यांचा १०,७१५ मतांनी पराभव केला. हुसेन यांना ८७,६९० मते मिळाली तर प्रतिस्पर्धी निखिल कुमारस्वामी यांना ७६,९७५ मते मिळाली. निखिल हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे पुत्र असून या मतदारसंघातून निखिल यांची वडील, एचडी कुमारस्वामी, आजोबा एचडी देवगौडा आणि आई अनिता कुमारस्वामी यांनी यापूर्वी प्रतिनिधीत्व केलं होतं.
८)बी झेड जमीर खान (चामरपेठ, बेंगळुरु)
बंगळुरू शहरांतर्गत येणाऱ्या चामरपेठ विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे जमीर खान तब्बल ५३,९५३ मतांनी निवडून आले. खान यांना ७७,६३१ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार भास्कर राव यांना २३,६७८ मते मिळाली आहे.
९) यू टी अब्दुल कादर (मंगळुरू)
मंगळुरू विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे यूटी अब्दुल कादर २२,७९० मतांनी निवडून आले. कादर यांना ८३, २१९ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपचे सतिश कुंपाला यांना ६०,४२९ मते मिळाली.