निलंग्यात लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
निलंगा /प्रतिनिधी लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पीयनशीप ग्रामीण टि १० दिवस रात्र क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा निलंगा येथे दि. १९ ते २२ मे या कालावधीत येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहेत. या स्पर्धेचा लाभ क्रिकेट प्रेमींनी घ्यावा असे अवाहन काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी केले. या स्पर्धेसाठी तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक ५१ हजार तर द्वितीय पारितोषीक ३१ हजार रुपये तसेच जिल्हास्तरावर प्रथम पारितोषीक १ लाख रूपये, द्वितीय ५१ हजार तर तृतीय पारितोषिक ३१ हजार ठेवण्यात आले आहे. तालुका स्तरातून प्रथम आलेले संघ जिल्हास्तरीय स्पर्धाना पात्र ठरतील दि १९ मे पर्यंत येथील काॅग्रेस जनसंपर्क कार्यालय, जिजाऊ चौक, निलंगा येथे पाचशे रुपये फिस भरुन संघाची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आयोजनकांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निलंगा तालुक्यात माजी पं. स. सदस्य महेश देशमुख, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष मदन बिरादार, मागासवर्गीय आघाडीचे शहराध्यक्ष गिरीश पात्रे, अमोल नवटक्के , धनाजी चांदुरे, शकील कादरी, आरिजीत मरगणे, साजन शिंदे प्रयत्न करत आहेत.