औसा,निलंगा,देवणी,शिरुर अनंतपाळ,लातूर तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकार्यांची मंथन बैठक संपन्न
लातूर,दि.१५ः जिल्ह्यातील औसा, लातूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ पाचही तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्यांची मंथन बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या अध्यक्षतेखाली रविवार,दि.१४ मे २०२३ रोजी पार पडली.
यावेळी नुकताच सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि या निकालामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उमेद नवी,आशा जागृत होऊन पक्ष वाढीसाठी काय करता येईल, पक्ष संघटन कसे मजबूत करता येईल, नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये काय काय अडीअडचणी आल्या त्यावर भविष्यात उपाययोजना काय करता येईल यासंदर्भामध्ये सखोल विचार मंथन करण्यात आले.
तालुकाप्रमुख शहर प्रमुख उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी या सर्वांचे शिवसेनेसाठी शिवसेना वाढीसाठी करत असलेले कार्य पक्ष वाढीसाठी काय उपाय योजना करणारं पक्ष संघटन कशा पद्धतीने करणार यावर औसा तालुका प्रमुख तानाजी सुरवसे ,निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे,लातूर तालुका प्रमुख बाबुराव शेळके, शिरुळ अनंतपाळ तालुका प्रमुख भागवत वंगे,लातूर युवा सेना जिल्हा अधिकारी ऍड.राहुल मातोळकर,जिल्हा महिला आघाडीच्या सुनीता चाळक, जिल्हा महिला कामगार आघाडीच्या प्रीतीकोळी, जिल्हा समन्वयक शिवसेना व्यापारी आघाडीचे सी.के.मुरळीकर,व्यापारी आघाडीचे बसवराज मंगरुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
जल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांनी २१ मे २०२३ रोजी नूतन जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्या मेळावा,पक्ष संघटन, पक्ष बांधणी, गावं तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक कसे तयार करायचे .निलंगा व औसा तालुक्यात आरोग्य शिबिराचे आयोजित करणे यावर सविस्तर मार्गदर्शन केले
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे,उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ सगरे,तालुका प्रमुख तानाजी सुरवसे,उपतालुका प्रमुख राम कुलकर्णी,विधानसभा प्रमुख एस.आर. चव्हाण,शहर प्रमुख रमेश माळी,रवी पिचारे,युवतीसेना जिल्हा श्रद्धा जवळगेकर, हेमालता पवार, सरोजा गायकवाड, कविता बडुरे, युवराज वंजारे, माधव कलमुकले,शहरप्रमुख दीपक मलभागे, उपशहर प्रमुख शिवराज मुळावकर,विष्णू तिगिले, सचिन नळेगावकर, नारायण कव्हेकर,सोमनाथ स्वामी,विष्णू बन, सूर्यकात माने,शिवराज पाटील,ब्रह्मा तिगिले,बाळू दंडिमे,सिद्धेश्वर जाधव,गोविंद श्रीमंगल, राम चोथवे,मच्छिन्द्र कांबळे, शंकर गंगणे,महेश चांदणे, दत्ता सूर्यवंशी, राहुल सगर,राघवेंद्र जवळगेकर, शिवराम शिंदे,
पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
औसा,निलंगा,देवणी,शिरुर अनंतपाळ,लातूर तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकार्यांची मंथन बैठक संपन्न
