गेल्या काही दिवसांत राज्यभरात ठिकठिकाणी दोन गटात होणाऱ्या वादामुळे हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरपासून सुरु झालेल्या वादाचे लोण आता राज्यभरात पसरले आहे. दरम्यान अकोल्यातील हरिहरपेठ भागात शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर या भागात संचारबंदी लावण्यात आलीये. तर काल अहमदनगरमधील शेवगावातही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे राज्यातील घडणाऱ्या या घटना पाहता भाजपचं हा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
दरम्यान यावर बोलताना खैरे म्हणाले आहे की, लोकसभा निवडणुकीत मतदार महाविकास आघाडीलाच पसंती देणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात कुठेच जातीय तेढ निर्माण होऊ दिली नाही. पण आता छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि शेवगावमध्ये दोन गटात वाद झाला. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांच्या काळात हे सर्वकाही घडत आहे. हिंदू आणि मुस्लीम यांना वेगळ करण्यासाठी यांच्याकडून राजकारण सुरु आहे. मुस्लीम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने उभं असल्याने असे प्रकार घडवले जात आहे. त्यामुळे दोन गटात होणारे वाद घडवले जात आहे. मुस्लीम मतदान उद्धव ठाकरे यांना मिळू नयेत म्हणून हा सर्व प्रकार सुरु आहे. तर हा सर्व घटना म्हणजेच भाजपचं लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं चंद्रकांत खैरे म्हटले आहे.
जलील यांना भाजपनेचं उपोषणाला बसवले…
दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दोन गटातील वादाला देखील भाजपच जबाबदार असल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. शहराच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी 17 दिवस उपोषण करण्यात आले. हे उपोषण करण्यासाठी जलील यांना भाजपच्या लोकांनी बसवले होते. त्याच काळात नामांतराच्या विरोधात काही मुस्लीम लोकं तयार झाले. यामुळे एक वातावरण तयार करण्यात आल्याचं देखील खैरे म्हणाले.
जनता लोकसभेत महाविकास आघाडीलाच मतदान करणार…
भाजपच्या खासदारांना 30 मे 30 जूनपर्यंत आपल्या मतदारसंघात राहून कामे करण्याच्या सूचना मिळाल्या असून, भाजप लोकसभेच्या तयारीला लागले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर बोलताना खैरे म्हणाले की, भाजपला कर्नाटकात मिळालेल्या अपयशामुळे ते कामाला लागले आहेत. त्यांना लोकसभा हवी आहेत. पण असे असलं तरीही राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला एकमत करायचं ठरवले आहे. तर आगामी मुख्यमंत्री देखील उद्धव ठाकरे होनरा असल्याचं खैरे म्हणाले.