महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हैद्राबाद येथे प्रदान
निलंगा- येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. प्रशांत गायकवाड यांना अविष्कार सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन संस्था कोल्हापूर यांच्या वतीने तेंलगणा शाखा हैद्राबाद यांच्याकडून जागतिक शिक्षकदिनानिमित्त राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम सालारजंग म्युझियम सभागृह, हैद्राबाद येथे संपन्न झाला. देशातील २२ राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या ७० शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार व राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तेलंगणा राज्याचे गृहमंत्री महमद महेमुदअली, तेलंगणा उच्चन्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती तथा तेलंगणा राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉ. चंद्रय्याजी, अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, अविष्कार फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष भोसले, तेलंगणा अविष्कार फाऊंडेशनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गुडरी रॉड्रीक व मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. प्रा. प्रशांत गायकवाड हे निलंगा येथील महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालयात सन २००८ पासून शिक्षक व २०१६ पासून उपप्राचार्य म्हणून शैक्षणिक कार्य करीत आहेत.
प्रा. गायकवाड यांच्या मिळालेल्या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर साहेब, संस्था सचिव बब्रुवान सरतापे, समन्वयक दिलीपराव धुमाळ, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके, महाराष्ट्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत पौळ, डॉ. सिध्देश्वर पाटील, माजी जि. प. सदस्य भरत गोरे, मुख्याध्यापक संजीव कदम, लहु कदम, आर.के. पाचंगे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक व मित्रमंडळीनी अभिनंदन केले आहे.