कर्नाटक काँग्रेसच्या विजयाचा निलंग्यात जल्लोष
निलंगा(शहर प्रतिनिधी):-निलंगा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलंगा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्याची आतिश बाजी करून एकमेकांना पेढे भरून जल्लोष करण्यात आला .यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की कर्नाटकातील जनतेचा विश्वास संपादन करून जाहीरनामा मध्ये दिलेल्या आश्वासनाची कॅबिनेटच्या पहिल्या मंत्रिमंडळात अंमलबजावणी करण्यात येईल.व येणाऱ्या चार राज्यात काँग्रेसचा पताका फडकवण्याची त्याचप्रमाणे महाराष्ट्रात व देशात काँग्रेसची सत्ता येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला व त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे ,काँग्रेसचे महासचिव प्रियांकजीगांधी,अखिल भा. काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, राहुल गांधी, डी के शिवकुमार त्यांचे अभिनंदन केले व भालकी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले ईश्वरजी खंडरे यांचे अभिनंदन केले.व महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माझी पक्ष निरीक्षक म्हणून भालकी मतदारसंघासाठी नियुक्ती केली व काम करण्याची संधी दिली.त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.असे ते म्हणाले यावेळी माजी नगराध्यक्ष हमीद शेख अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,अल्पसंख्याचे तालुक्याध्यक्ष लाला पटेल लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी,निलंगा विधानसभा युवक अध्यक्ष, अमोल सोनकांबळे, शहराध्यक्ष मुजीब सौदागर,अँड तिरूपती शिंदे, माजी सभापती असगर अन्सारी ,सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत कांबळे,मा. नगरसेवक प्रकाश बाचके, मुगळे विलास,तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,पुरुषोत्तम कुलकर्णी,शेषराव कांबळे, सिद्धू आवले, वीरभद्र आग्रे, सबदर कादरी, अबरार देशमुख, रोहन सुरवसे,बालाजी गोमसाळे, अजय कांबळे, अनिल अग्रवाल,सरपंच हरिदास बोळे, इत्यादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी माजी नगरसेवक नेते कार्यकर्ते उपस्थित होते.