देशात भाजप जे काही करीत आहे, त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांना रोखण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यातच देशाचे कल्याण होणार असल्याचा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला. त्यानंतर त्यांनी देशातील विरोधकांचा चेहरा शरद पवारांनी बनावे, असा आग्रहही धरला.
देशात BJP विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येत आहेत. त्यासाठी बिहाराचे मुख्यमंत्री नितीशकुमार विरोधकांची मोट बांधत आहेत. त्यापूर्वी कुमार यांनी ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. आता ते मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत बिहारचे उपमुख्यमंत्रीTESJI YADAV होते. भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
म्हणाले, भाजपच्या कारनाम्यांमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही टिकविण्यााठी भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यावरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार व इतरांशी चर्चा झाली आहेत. त्यावेळी सर्व नेत्यांनी सहमती दर्शविली आहे. आता आम्ही सर्वजण एकत्र लवकरच बैठक घेणार आहोत. त्यानंतर होणाऱ्या गटाचे नावही ठरेल.पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याचा आनंद झाल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली. नितीशकुमार म्हणाले, “देशात लोकशाही टिकविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यातच पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या निर्णयाने दुःख झाले होते. आता त्यांनी राजीनामा मागे घेतल्याने आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे आता पवार यांनी विरोधकांचा चेहरा बनावे.”
कर्नाटकच्या जनतेने आता राज्यात ‘सेक्यूलर’ सरकार आणण्याचे ठरविले आहे. त्यानंतर देशातही चित्र बदलण्याचा दावाSHARAD PAWAR यांनी केला आहे.
पवार म्हणाले, “आज देशताली लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांना एकत्र येऊन काम करून देशाला पर्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याला सर्वांचे समर्थन आहे. कर्नाटकमधील जनातेने ‘सेक्यूलर’ सरकार आणण्याचे ठरविले आहे. तेथील निकालाने देशातील स्थिती बदलेन. त्यासाठी सर्वांना मिळून काम करण्याची गरज आहे. त्याची पूर्तता करण्यासठी नितीशकुमार सर्वांशी बोलत आहेत. विरोधकांच्या गटात राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर पक्षातील नेतेही येण्यासाठी तयार आहेत. जनतेला भाजपशिवाय चेहरे आडतात. विरोधकांचा चेहरा नंतर ठरवू.”