गेल्या काही महिन्याभरांपासून प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज (१६ मे) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या वेळी न्यायालयाने महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तसेच उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे आम्ही त्यांचे सरकार पुनर्स्थापित करू शकत नाही, असे मतही नमूद केले. राज्यपालांचा एकंदरीत कारभार, विधानसभा अध्यक्षांनी केलेली प्रतोदांची नियुक्ती आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा या तीन प्रमुख बाबींवर न्यायालयाने भाष्य केले. यावरून आता सोशल मीडियावर मीम्सचा जणू महापूर आला आहे. यातील काही मीम्स विचार करण्यास भाग पाडणारे आहेत, तर काही तुम्हाला पोट धरून हसवणारे आहेत, हे मात्र नक्की.
https://twitter.com/Abhijeet_9090/status/1656595148023930882?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656595148023930882%7Ctwgr%5E13db6cc4ae1fabc71a4e1ab68e662793b52da1ec%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fmaharashtra-political-crisis-maharashtra-satta-sangharsh-updates-sc-hearing-netizens-react-with-memes-in-twitter-facebook-whatsapp-sjr-98-3649903%2F
अनेक राजकीय नेत्यांकडून या निर्णयावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र सोशल मीडियावर यूजर्सकडून येणाऱ्या भन्नाट- भन्नाट प्रतिक्रियादेखील वाचण्यासारख्या आहेत…
https://twitter.com/khadse_gulab/status/1656581990349406209?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656581990349406209%7Ctwgr%5E13db6cc4ae1fabc71a4e1ab68e662793b52da1ec%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fmaharashtra-political-crisis-maharashtra-satta-sangharsh-updates-sc-hearing-netizens-react-with-memes-in-twitter-facebook-whatsapp-sjr-98-3649903%2F
राज्यातील सत्तासंघर्षावर व्हॉट्सअपवर व्हायरल होणारे मीम्स :
१) मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर .
एकमेकांची पसंती बेकायदेशीर .
साखरपुडा बेकायदेशीर .
लग्न बेकायदेशीर .
पण झालेले बाळ मात्र कायदेशीर…
२) ▪️लग्न लावण्याचा निर्णय योग्य नव्हता
▪️पुजारी अयोग्य होता
▪️मंत्र चुकीचे होते
▪️फेरे मारले ते योग्य होते
▪️लग्न तूर्त कायम
▪️नवरा नवरी एकमेकांना अनुरूप आहेत का याचा निर्णय पुजारी घेईल
वरील परिस्थितीचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा संबंध नाही. असल्यास योगायोग समजावा.
३) इमारत पूर्णतः बेकायदा आहे, मालक बेकायदा आहे, आर्किटेक्ट बेकायदा, बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय…
पण पाडायची की नाही ते बांधणारे ठरवतील! – सर्वोच्च निवाडा
४) चोरांनी चोरी केली हे बेकायदेशीर कृत्य
– सर्वोच्च न्यायालय
चोरांना ज्यांने पाठबळ दिले ते पाठबळ बेकायदेशीर
– सर्वोच्च न्यायालय
चोरी केलीच तर मग चोरीचा माल चोरांनाच दिला हे मात्र कायदेशीर आहे..
– सर्वोच्च न्यायालय
न्यायपालिका जनतेचा विश्वास गमावत चालली एवढे मात्र सत्य आहे.
५) कोर्टाचा निकाल:
शिंदे यांनी ठाकरेंना नोबॉल टाकला. फडणवीसांनी अंपायरकडे खोटी अपील केली. अंपायर कोशारी यांनी चुकीचा निर्णय देत आऊट दिले. आणि अशाप्रकारे नोबॉलवर ठाकरेंची विकेट घेतली. पण थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत ठाकरे मैदान सोडून मातोश्रींकडे जाऊन बसले. “त्यामुळे आता त्यांना परत बॅटिंगला बोलवता येणार नाही. ते मैदानावरच असते, तर त्यांना परत बॅटिंग करायला लावली असती. आता उरलेली मॅच कंटिन्यू करा.”, असं थर्ड अंपायर म्हणतोय.
६) कसली हिरवळ, अन कसला झिरवळ..
घरीच राहणार सुकलेलं पडवळ
https://twitter.com/prashantsaykar/status/1656580770599944192?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1656580770599944192%7Ctwgr%5E13db6cc4ae1fabc71a4e1ab68e662793b52da1ec%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fmaharashtra-political-crisis-maharashtra-satta-sangharsh-updates-sc-hearing-netizens-react-with-memes-in-twitter-facebook-whatsapp-sjr-98-3649903%2F