• Sun. May 4th, 2025

10-12 वीच्या उत्तरपत्रिकांत विद्यार्थ्यांनी‎ लिहिला “पुष्पा, झुकेगा नहीं” चा डायलॉग‎, 71 विद्यार्थ्यांची बोर्डात सुनावणी

Byjantaadmin

May 11, 2023

कुणाच्या उत्तरत्रिकेत पान फाटलेले,‎ तर कुणाच्या खाणाखुणा, कुठे‎ मोबाइल क्रमांक लिहून प्लीज पास‎ करा, देवा मला पास कर, असा‎ मजकूर लिहून एवढ्यावच न थांबता ‎ ‎ काही विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या ‎ ‎ उत्तरपत्रिकांमध्ये चक्क पुष्पा…‎ झुकेगा नहीं साला… हा चित्रपटातील ‎ ‎ डायलॉग लिहिल्याचा प्रकार समाेर ‎ ‎ अाला अाहे.

त्यामुळे मंगळवारपासून ‎ ‎ आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या‎ विद्यार्थ्यांच्या सुनावणीदरम्यान ‎ ‎ उत्तरपत्रिकेच्या शेवटी आणि मध्येच ‎ ‎ चक्क कर्सिव्ह रायटिंगमध्ये उत्तर ‎ ‎ लिहिल्याचेही दिसून आले. परंतु, हे‎ आमचे अक्षर नाही, उत्तरपत्रिकेत‎ कसे आले हे अाम्हाला माहिती नाही,‎ असे उत्तर बुधवारी विभागीय‎ मंडळाच्या विद्यार्थी सुनावणीदरम्यान‎ समाेर अाले.‎

आता १३ मेपर्यंत झालेल्या‎ सुनावणीनंतर तदर्थ समितीसमोेर‎ अहवाल ठेवून पुढील निर्णय घेणार‎ असल्याचे विभागीय शिक्षण‎ मंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ तसेच, उत्तरपत्रिकेतील आक्षेपार्ह‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ लेखनावरील सुनावणी हा नियमित‎ भाग असल्याचा पवित्राही त्यांनी‎ घेतला. मात्र, उत्तरपत्रिकेत‎ अक्षरबदल झाले कसे हे अद्यापही‎ समजू शकले नाही.

त्यामुळे‎ मॉडरेटरमुळे उघडकीस आलेल्या या‎ प्रकारावर आता उत्तरपत्रिका‎ तपासणारे शिक्षक, केंद्र संचालक,‎ मॉडरेटर यांचीदेखील चौकशी होऊ‎ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात‎ आलेल्या बारावीच्या परीक्षेत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या‎ विद्यार्थ्यांची १३ मेपर्यंत सुनावणी‎ करण्यात येत आहे.

यात ९ मे रोजी‎ अंबाजोगाई, पैठण, केज येथील‎ काही मुलांच्या उत्तरपत्रिकेत‎ हस्ताक्षर बदल असल्याचे आढळून‎ आल्याने त्यांना सुनावणीसाठी‎ बोलावल्याने खळबळ उडाली, तर‎ बुधवारी पुन्हा या प्रकारात ७४‎ जणांना सुनावणीसाठी बोलवले‎ होते. त्यापैकी ७१ जण उपस्थित‎ हाेते. आक्षेपार्ह लेखन करणाऱ्यांची‎ ‎ ‎ एकूण संख्या ५०० आहे. या मुलांच्या‎

सुनावणीवरून नेमका प्रकार कुठे,‎ का आणि कुणी केला, याचा शोध‎ घेणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी‎ सांगितले.

मात्र, विद्यार्थ्यांच्या मते,‎ यात आम्ही दोषी नाही, कुणी‎ लिहिले माहीत नाही, आम्ही तर‎ कर्सिव्ह लिहीत नाही, अशी उत्तरे‎ विद्यार्थ्यांनी या वेळी दिली. त्यामुळे‎ आता हा प्रकार कसा झाला याचे‎ उत्तर विभागीय मंडळाकडून शोधले‎ जात आहे.‎

असा होतो उत्तरपत्रिका‎ पाठवण्याचा प्रवास‎

केंद्रावर पेपर झाल्यानंतर केंद्र‎ संचालक सर्व उत्तरपत्रिकांची‎ नोंद घेऊन त्या मोजून‎ कस्टोडियनकडे पाठवतो.‎ त्यानंतर मुख्याध्यापक, कनिष्ठ‎ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे‎ उत्तरपत्रिका जाऊन ते‎ तपासणीसाठी शिक्षकांना‎ देतात. शिक्षकांकडून तपासणी‎ झाल्यावर पुन्हा मॉडरेटरकडून‎ बोर्डाकडे उत्तरपत्रिका येतात.‎

अशी होते विद्यार्थी सुनावणी ​​​​​​​

हा पेपर तुमचा आहे का? यातील हस्ताक्षर‎ तुमचे आहे की नाही?, तुम्ही आक्षेपार्ह लेखन केले काॽ पान फाडले आहे का?‎ तुमच्यासोबत पालक आले आहेत की नाही ? तुम्हाला गुन्हा मान्य आहे का‎ नाही? असे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांचे मत नोंदवले जात आहे.‎

असा होतो उत्तरपत्रिका‎ पाठवण्याचा प्रवास‎ केंद्रावर पेपर झाल्यानंतर केंद्र‎ संचालक सर्व उत्तरपत्रिकांची‎ नोंद घेऊन त्या मोजून‎ कस्टोडियनकडे पाठवतो.‎ त्यानंतर मुख्याध्यापक, कनिष्ठ‎ महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे‎ उत्तरपत्रिका जाऊन ते‎ तपासणीसाठी शिक्षकांना‎ देतात. शिक्षकांकडून तपासणी‎ झाल्यावर पुन्हा मॉडरेटरकडून‎ बोर्डाकडे उत्तरपत्रिका येतात.‎

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *