• Sun. May 4th, 2025

2024 च्या निवडणुकामध्ये युवा वॉरियर्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते योध्दे म्हणून कार्य करतील- चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपा

Byjantaadmin

May 10, 2023

2024 च्या निवडणुकामध्ये युवा वॉरियर्सचे
पदाधिकारी व कार्यकर्ते योध्दे म्हणून कार्य करतील
चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

लातूर :-भाजपाचे प्रदेश सचिव विक्रांतदादा पाटील, युवा मार्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आदेशानुसार व युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहरात भाजपा युवा मोर्चा व युवा वॉरियर्सचे काम राज्यात आघाडीवर सुरू आहे. 18 ते 25 वयोगटातील युवकांना एकत्र पक्षाचे संघटन वाढविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केलेले आहे. या संघटनाच्या माध्यमातून साठाच्या शाखेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून भविष्यात या शाखा 100 ते 150 वर जातील आणि 2024 निवडणुकामध्ये युवा वॉरियर्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते योध्दे म्हणून सक्रीयपणे कार्य करतील असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यावेळी ते राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानापासून बार्शी रोड भागातील संविधान चौकात आयोजित भव्य मोटारसायकल रॅली समारोप व युवा वॉरियर्सच्या साठाव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होेते. यावेळी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.गोविंद केंदे, भाजपाचे प्रदेश प्रवक्‍ते गणेश हाके, माजी आ.सुधाकर भालेराव, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ.रमेशअप्पा कराड, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा युवा मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विवेकानंद उजळंबकर, भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, मराठवाडा प्रभारी अरूण पाठक, भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा प्रभारी अनिल पाटील बोरगावकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दत्ता चेवले, अ‍ॅड.गणेश गोमचाळे, अमोल निडवदे, भाजयुमो प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविशंकर केंद्रे, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,  भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, भाजपा युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.ज्ञानेश्‍वर चेवले, सरचिटणीस तानाजी बिराजदार, सांस्कृतिक प्रकोष्ट समितीचे प्रदेशााध्यक्ष शैलेश गोजमगुंडे,  अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, वैभव डोंगरे, गजेंद्र बोकण, सागर घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, भारत हा सर्वोत्तम देश व्हावा ही आपली भूमिका असून देशहितासाठी संस्कार, समृध्दी, धर्म, देवता व संस्कृती जोपासण्याचे काम आपण पक्षाच्या माध्यमातून करीत आहोेत. यापुढील कालावधीत प्रत्येक बुथवर 50 युवकांची शाखा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागा असे आवाहन करीत प्रत्येक विधानसभेचा दौर करीत डिसेंबर 2023 पर्यंत राज्याचा दौरा पूर्ण करून पक्ष संघटन वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी एकूण नियोजनामध्ये 6 तास विधानसभा मतदार संघासाठी राहणार आहेेत. यामध्ये दोन तास भाजपा युवा मोर्चासाठी देणार असून येणार्‍या सर्वच निवडणुका ताकतीने लढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दूल गालीब शेख तर आभार अ‍ॅड.पुनम पांचाळ यांनी मानले.   यावेळी या कार्यक्रमाला लक्ष्मण मोरे, ऋषी जाधव, राहूल भूतडा, सुनिल राठी, सागर घोडके, संतोष ठाकूर, शंभूराजे पवार, महादू पिटले, संतोष तिवारी, युवराज कतारी, गणेश खाडप, आकाश बजाज, पांडुरंग बोडके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश पवार, गौरव बिडवे, धिरज भैरूमे, अ‍ॅड.ऋषीकेश पांचाळ, काका चौगुले, रविशंकर लवटे, किशोरदादा घार, नेताजी मस्के, गोविंद सोदले यांच्यासह भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह युवा वॉरियर्सचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *