कलासृष्टीच्या कला दालनातील कलात्मक व्यक्तीमत्व महेबुब शेख यांचा सत्कार
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सहकार महर्षी स्व.लोकनेते अॅड.विश्वांभररावजी माने साहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याच नुकतंच लोकार्पण सोहळा पार पाडला.
कलासृष्टीच्या कला दालनातील कल्पशिलेचा उत्कृष्ठ असा नमुना असणारी स्व.लोकनेते विश्वांभररावजी माने यांची हि रेखीव मुर्ती ज्यांनी घडविली ते कलात्मक व्यक्तीमत्व महेबुब शेख निलंगेकर हे सोहेल भाई शेख यांचे वडील आहेत.
कलाकाराच्या कुलसर्यातुन घडलेल्या या प्रेक्षणीय शिल्पाबद्दल स्मारक अनावरण समीतीच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख ,माजीमंत्री आ.राजेश टोपे,माजी मंत्री आ.संजयजी बनसोडे,आ.बाबासाहेब पाटील ,आ.राजेशजी पवार,आ.राम पाटील रातोळीकर,अशोक भैय्या निलंगेकर,अभय दादा साळुंके,मा.सुरज दादा चव्हाण,.प्रतापराव माने ,जयेश माने,सुतेज माने या सर्व मान्यवरांच्या हस्ते शिल्पकार महेबुब शेख यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला.