दानिश सिद्दीकी आणि त्यांचे सहकारी अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू आणि अमित दवे यांना भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे फोटो काढण्यासाठी सन्मानित करण्यात आले. कोरोना महामातील वास्तव आपल्या कॅमेऱ्यातून मांडणाऱ्या दानिश सिद्दीकी यांनी अनेक हृदयद्रावक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले.
15 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात दिल्लीतील लोक नायक जय प्रकाश (LNJP) रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेताना दानिश यांनी ह फोटो काढला.
दिल्लीतील स्मशानभूमीत पुरेशी जागा नसल्यामुळे मृतदेहांवर पार्किंगमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी दानिश सिद्दीकी यांनी टिपलेले छायाचित्र
29 एप्रिल 2020 रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत कोरोनामुळे मरण पावलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्याचे दफन करण्यापूर्वी एका आरोग्य कर्मचाऱ्याची झालेली अवस्था दानिश यांनी आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहे.
हा फोटो 24 एप्रिल रोजीचा नवी दिल्लीतील स्मशानभूमीचा आहे. यामध्ये लोक कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत.
4 मे – नवी दिल्लीतील स्मशानभूमीत दानिश यांनी हा फोटो घेतला. यामध्ये कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील सदस्य आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत.
24 एप्रिल – गाझियाबादमधील गुरुद्वाराजवळ मनोज कुमार कारमध्ये त्यांची आई विद्या देवी यांच्या शेजारी बसले असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. ा
दानिश सिद्दीकी आणि त्यांच्या टीमला 2018 मध्येही उत्कृष्ट कार्यासाठी पहिला पुलित्जर पुरस्कारही मिळाला होता. दानिश सिद्दीकी यांनी आपल्या छायाचित्रांमध्ये म्यानमारमधील रोहिंग्या निर्वासितांची समस्या दाखवली होती. ही छायाचित्रे पाहून लोकांना रोहिंग्यांवरील संकटाच्या गांभीर्याचा अंदाज आला.