आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदके मिळविणाऱ्या कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षाविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शिवसेनेच्या ठाकरे गटासह क्रीडापटूंनी मूक धरणे आंदोलन केले. खासदार ब्रिजभूषण यांच्या विरोधात कडक कारवाई करून खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.
शिवसेनेच जिल्हाप्रमुख प्रा. शरद पाटील (Sharad Patil) यांच्या पुढाकाराने शहरातील विविध क्रीडापटूंसह (Sports) आक्रमक आंदोलन झाले. नवी दिल्लीत (New Delhi) धरणे आंदोलन करणाऱ्या खेळाडूंना पाठींबा म्हणून झालेल्या या आंदोलनात तीनशेहून अधिक क्रीडा संघटना, व्यायामशाळा, खेळाडू व विविध पक्षाच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
यावेळी प्रा. शरद पाटील म्हणाले, देशासाठी सर्वोत्तम कामगिरी नाराजीअभिमान आहेत. त्यांचा सर्वस्तरावर गौरव करण्यात आला आहे. शासनाने त्यांचे कौतुक केले. आज त्या टाहो फोडून न्याय मागत आहेत. अशावेळी एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे काम सरकार का करीत आहे. दोषींविरोधात गंभीर कारवाई का केली जात नाही. याबाबत समाजात रोष आहे. केंद्र सरकारबाबत नाराजी वाढत असल्याने त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंब्यासाठी येथे तीन तासांचे धरणे आंदोलन झाले. छत्रपती पुरस्कारविजेते माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या पुढाकाराने पक्षविरहित आंदोलन झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेत मूकबधिरांच्या गटात सुवर्णपदकविजेती वैष्णवी बाला मोरे हिच्या हस्ते गांधी पुतळ्याला हार अर्पण झाल्यावर धरणे आंदोलनास सुरवात झाली.
खो-खो संघटनेचे सल्लागार वास्तुतज्ज्ञ सुधाकर देवरे, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अॅड. रवी देसर्डा, मुरलीधर लोकरे, भगवान कालेवार, नंदलाल फुलपगारे, खो-खोपटू डॉ. आनंद पवार, राष्ट्रीय बास्केटबॉलपटू मुद्रा अग्रवाल, सुवर्णपदकविजेती बास्केटबॉलपटू श्रेया जाधव, सजन चौधरी, अशोक आव्हाड, चंद्रकांत शेळके, अण्णा फुलपगारे, मास्टर स्पोर्टस ॲकॅडमीचे लोकेश पाटील, फिरोज शब्बीर शाह, अमित पिंजारी, दत्तू गवळी, लखन चांगरे, शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे भालचंद्र सोनगत, क्रीडाशिक्षक पवन चौधरी, प्रा. बी. ए. पाटील, प्राचार्य बी. टी. सोनवणे, प्रा. जसपाल सिसोदिया, प्रा. निकिता कुलकर्णी, सुरेखा नांद्रे, दिलीप देवरे, अतुल सोनवणे, रणजित भोसले, गोरख पाटील, धीरज पाटील, कैलास मराठे, विनोद जगताप, आदित्य मराठे, संजय जवराज, सुभाष शिंदे, विश्राम बिरारी, एल. आर. राव यांच्यासह अन्य मान्यवर, खेळाडू आंदोलनात सहभागी झाले. जूनमध्ये दिल्लीत आंदोलक बजरंग पुनिया, साक्षी मलिक, बिनीत फोगाट व अन्य खेडाळूंना येथे निमंत्रित करून नागरी सत्काराचा संकल्प आंदोलनावेळी सोडण्यात आला.