साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळातंर्गत अनुदान, बिजभांडवल योजना व थेट कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन
- अर्ज विनामुल्य कार्यालयात उपलब्ध
- सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ
- मांग, मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील राज्यस्तरीय क्रिडा पुरस्कार महिला / पुरुषांना प्राधन्य
लातूर,दि.4(जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय, लातूर येथील थेट कर्ज योजना, अनुदान योजना व बिजभांडवल योजनातंर्गत सन 2023-2024 या आर्थिक वर्षातील कर्ज मागणी अर्ज वाटप सुरु झाले आहे. मांतग समाजातील गरजू शहरी / ग्रामीण भागातील लाभार्थींनी दि. ०४ मे, २०२३ ते दि.३१ मे, २०२३ पर्यंत जिल्हा कार्यालय, लातूर येथून प्रत्यक्ष लाभार्थींने स्वत:कर्ज मागणी अर्ज घेण्यात यावेत. तसेच अर्जा संबंधित कागदपत्रे जोडून जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट लातुर येथे अर्ज विनामुल्य असेल. लाभार्थींने स्वत: अर्ज कार्यालयात जमा करावे असे जिल्हा व्यवस्थापक रमेश दरबस्तेवार यांनी आवाहन केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील दारिद्र्य रेषेखालील महिला / पुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत सन – २०२३ -२०२४ या आर्थिक वर्षाकरिता थेट कर्ज योजना रुपये एक लाख अंतर्गत ९० चे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
मांग, मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील राज्यस्तरीय क्रिडा पुरस्कार महिला / पुरुषांना प्राधन्य राहिल. तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या एका सदस्यास प्राधान्याने लाभ दिला जाईल.
अनुदान व बिजभांडवल योजना
तसेच राष्टीयकृत बँके मार्फत ५० टक्के अनुदान योजना व २० टक्के बिजभांडवल योजनचेही उद्यिष्टे प्राप्त झाले आहे. सदरील योजनेचे अर्ज महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयात उपलब्ध असून प्रत्यक्ष लाभार्थीने लाभ घ्यावा. सदर लाभार्थीने स्वत : कार्यालयात येऊन कर्ज मागणी अर्ज घेणे व कार्यालयात अर्जासोबत कागदपत्रासह जमा करावे .
थेट कर्ज मागणी अर्जातील अटी / शर्ती व निकष
जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. ३.०० लाखपेक्षा जास्त नसावे). आधार कार्ड, पॅन कार्ड , रेशन कार्ड व मतदान कार्ड इ., अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष़ असावे., अर्जदाराचे सिबील क्रेडिट स्कोर ५०० असावा. अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल. अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा. अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायचे ज्ञान व अनुभव, प्रशिक्षीत असावा. अर्जदाराने महामंडळाचे प्रचलीत नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रे, करारपत्रे व व्यवसाय परवाना इत्यादी कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
या योजनेत साधारपणे पुरुष व महिला ५० टक्के आरक्षण राहिल, ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहिल. अर्जदारास कर्ज वितरणापुर्वी, त्याच्या वारसदाराचे बंधपत्र देणे आवश्यक आहे. अर्जदारास कर्जमंजुरी नंतर (०२) जामनिदार देणे बंधनकारक आहे. दोन (०२) जामीनदार मालमत्ता धारक हे स्तावर मालमत्ता किंवा जंगम मालमत्ता धारक असावा. दोन (०२) फोटो., व्यवसायचे दरपत्रक (कोटेशन), मातंग समाजातील राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कार प्रमाणपत्र व सैन्य दलातील विर गती प्रमाणपत्र असल्यास प्राधन्य राहिल. तसेच महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अधिक माहितीसाठी कार्यालयात येऊन संपर्क साधावा.