• Wed. Apr 30th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील  बाजार समितीच्या नवंनिर्वाचीत काँग्रेसच्या ६५ संचालकांचा सत्कार

Byjantaadmin

May 4, 2023
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातील  बाजार समितीच्या नवंनिर्वाचीत काँग्रेसच्या ६५ संचालकांचा सत्कार
आशियाना बंगल्यावर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी
 दिलीपराव देशमुख यांचे नवनिर्वाचित संचालक मंडळांनी घेतले आशीर्वाद
विकासकामांची मतदारांनी दिली पावती माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मनोगत
लातूर :-जिल्ह्यातील बाजार समितीच्या नुकत्याच पार पडल्या असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृ्त्वाखाली लातूर, रेणापूर ,उदगीर बाजार समिती काँग्रेसच्या ताब्यात मतदारांनी बहुमतांनी निवडून आल्या असून  विरोधी पॅनल ला झिडकारले आहे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला घवघवीत यश प्राप्त झाले आहे त्याबद्दल जिल्ह्यातील लातूर रेणापूर उदगीर ,अहमदपूर तालुक्यातील ६५ नविनिर्वाचीत सदस्यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांची  बुधवारी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला  दरम्यान आशियाना बंगल्यावर पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाली होती आशियाना सरस्वती कॉलनी ते खाडगाव रोड एक तास वाहतूक जाम झालेली होती अवघ्या काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली अशियाना बंगला पासून आर्धा किलो मिटर अंतरावर चार चाकी वाहनाची रांग लागली होती
*मतदारांनी विकासकामाची पावती दिली*
*माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मनोगत*
लातूर जिल्ह्यातील लातूर उदगीर रेणापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी व ग्रामपंचायत मतदारांनी कृषी विकास पॅनल च्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून दिले असून ही मागच्या कार्यकाळात आपण केलेल्या कार्याची पावती आहे असे सांगून  माजी मंत्री दिलीपराव पाटील यांनी नूतन संचालक मंडळाने येणाऱ्या काळात चांगले कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या तसेच आमदार अमित भैय्या देशमुख आमदार धीरज देशमुख यांचेही त्यांनी अभिनंदन केल
यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार अँड त्रिंबक भिसे,  साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, मजिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड किरण जाधव, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,लातूर बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा,  विलास बँकेचे उपाध्यक्ष अँड समद पटेल,जील्हा बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे पृथ्वीराज सिरसाठ, जिल्हा बँकेच्या संचालिका श्रीमती  लक्ष्मीताई भोसले ,मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शाम भोसले, काँग्रेस मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी , गणेश एस आर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते
*आशियाना बंगल्यावर लातूर रेणापूर उदगीर अहमदपूर नूतन संचालकांची उपस्थिती*
यावेळी  लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके रेणापूर तालुका अध्यक्ष अँड प्रमोद जाधव, उदगीर तालुका काँग्रेस अध्यक्ष कल्याण पाटील, औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, नवनिर्वाचित सदस्य शिवाजीराव हुडे उदगीर, जगदीश बावणे,सुभाष घोडके अँड युवराज जाधव  अशोक राठोड  रेणापूर,पवार आहमदपुर,यांच्यासह राजेंद्र भोसले, चांदपाशा इनामदार, सतीश पाटील, विजय कदम सचिन दाताळ, बाळासाहेब जाधव,  राजकुमार जाधव यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed