NCP Anil Patil : (Sharad Pawar) यांच्या निर्णयानंतर राज्यभरातील कार्यकर्ते नेते तीव्र विरोध करत आहेत. अनेकांनी राजीनामा (Resign) देण्यास सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आमदार अनिल पाटील हे राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिलेले आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये (NCP) राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक महत्त्वाचा राजीनामा अनिल पाटील यांचा असल्याचे समोर आले आहे.
ncpच्या अध्यक्षपदावरून दूर होत असल्याची घोषणा (Sharad Pawar) करताच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ आलेली आहे. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केलेलं आहे. तर आता राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) यांनी सुद्धा आमदार पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र पवारांना पाठवले. राष्ट्रवादी पक्षातून हा एक मोठा राजीनामा असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांनी आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं पत्र शरद पवार यांना दिलं. काही वेळापूर्वी अनिल पाटील हे सिल्वर ओकवर आले होते आणि त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यावेळेस आपण शरद पवार यांनी घेतलेली भूमिका मागे घ्यावी, अन्यथा आमदारकीचा राजीनामा देऊन असे पत्र दिले आहे.
राज्यामध्ये राष्ट्रवादीचे वेगवेगळे पदाधिकारी हे राजीनामा देत आहेत. राज्यात anil patil हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तसेच प्रतोद म्हणूनही काम पाहतात. पाटील यांनी आज सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेत राजीनामा पत्र दिले आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा हा विधान सभा अध्यक्षांना द्यावा लागतो, मात्र अनिल पाटील यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिले आहे. यावेळी अनिल पाटील म्हणाले की, ‘आमचे जे काही राजकीय अस्तित्व आहे, शरद पवार यांच्यामुळे आहे, त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, त्यामुळे मी हे राजीनाम्याचे पत्र शरद पवार यांना दिले आहे. तसेच शरद पवार यांनी ठोस निर्णय घेतल्यानंतर आम्ही आपली भूमिका स्पष्ट करू.
निर्णय मागे घ्यावा….
शरद पवार यांनी सर्वसामान्य जनतेसह पक्षातील सर्व प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भावनांचा आदर करून आपला निर्णय मागे घ्यावा अशीही मागणी अनिल पाटील यांनी केली जर ते आपला निर्णय मागे घेणार नाही, तर आमदारकीचा आम्ही राजीनामा देणार आहोत. माझ्यासह पक्षातील इतर आमदार देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असे अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच निषेध म्हणून आम्ही स्वरूपातला मी राजीनामा दिलेला आहे, मात्र शरद पवार यांनी आता अंतिम निर्णय घ्यायचा असल्याचे ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा; पवारसाहेबांनी निर्णय मागे घ्यावा, आव्हाडांची मागणी
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. सर्वांनी आपले राजीनामे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, “शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नवीन कोणी अध्यक्ष झाला असेल तर त्या संदर्भात मला माहिती नाही. एकदा शरद पवार पदावरून बाजूला झाले की, मग ते लक्ष देणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आहे.”
मंगळवारी (2 मे) अजित पवार यांनी पक्षातील कोणाचाही राजीनामा स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं, असं असतानाही जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल देसाई यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात होतं. मात्र जयंत पाटील यांनी स्वतः एबीपी माझाशी बोलताना राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं. तसेच, अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे त्यांच्याकडे येत असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.