• Mon. Apr 28th, 2025

अशोक चव्हाणांनी नांदेड बाजार समितीही राखली, भाजप-युतीला भोपळा..

Byjantaadmin

Apr 30, 2023

भोकर मतदारसंघातील बाजार समितीवर (Nanded APMC Result News) बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठेची नांदेड बाजार समिती देखील राखली. महाविकास आघाडीने येथे सर्वच्या सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिंदे गटाच्या युतीला इथे भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे गल्ली ते दिल्ली नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांचाच आवाज चालतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नांदेड बाजार समितीमध्ये ASHOK CHAVHAN महाविकास आघाडीची मोट बांधत राष्ट्रवादी, ठाकरे गटाला देखील सोबत घेतले होते. ज्याची जितकी शक्ती, तितके त्याला प्रतिनिधित्व या धोरणानूसार जागा वाटप केले. MVA  एवढेच नाही तर रणनिता आखून काॅंग्रेससह राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या जागा देखील निवडून आणल्या. चव्हाणांच्या या खेळीमुळे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी खासदार चिखलीकरांना मात्र धक्का बसला आहे.

भोकर या आपल्या मतदारसंघातील बाजार समितीनंतर नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.  PRATAP PATIL CHIKLIKAR यावेळी चव्हाणांनी उमेदवारी देतांना नव्या चेहऱ्यांना संधी देत जुन्या संचालक व इतर पदाधिकाऱ्यांना थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे काही प्रमाणात काॅंग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. काहींनी चव्हाणांचा आदेश शिरसावंद्य मानला, तर काहीनी वेगळी वाट धरली.

मात्र या सर्वावर मात करत अशोक चव्हाणांनी नांदेड बाजार समितीवरची सत्ता कायम राखली. १८ पैकी सर्वाधिक १२ जागा या काॅंग्रेसने जिंकल्या, तर राष्ट्रवादी ३, ठाकरे गट २ व १ जागा अपक्षाला मिळाली. एकमेव अपक्ष संचालकाने देखील आपला पाठिंबा महाविकास आघाडीला जाहीर केला आहे. त्यामुळे चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने भाजप-शिंदे युतीला क्लीन स्वीप दिला आहे.

भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ झाला असून त्यांना खातेही उघडता आले नाही. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, शिंदे गटाचे हेमंत पाटील व आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण अशोक चव्हाणांमुळे ती धुळीस मिळाली. नांदेड-भोकरसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यावर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed