LATUR विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अंतिम एफ आर पी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा
गाळप हंगाम 2022 -23 मध्ये मांजरा कारखान्याने एकूण पाच लाख 51 हजार 611 मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, चार लाख 81 हजार 620 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्ही एसआय, पुणे यांनी कारखान्याचा अंतिम उतारा 11.574 टक्के इतका निश्चित करून दिलेला आहे.त्याप्रमाणे कारखान्याची अंतिम एफ आर पी ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता रक्कम रुपये 2725 प्रति मे टन इतकी निश्चित झाली आहे.कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी मा. श्री. दिलीपरावजी देशमुखसाहेब यांच्या सूचनेप्रमाणे, तसेच माजी मंत्री आ.श्री.अमित विलासराव देशमुखसाहेब व लातूर ग्रामीण चे आमदार श्री.धीरज विलासराव देशमुखसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कारखान्याने यापूर्वी एफ आर पी पोटी रक्कम रुपये 2400 प्रति मे टन प्रमाणे शेतकऱ्यांना अदा केलेली आहे.अंतिम एफ आर पी ची उर्वरित रक्कम रुपये 325 प्रति मे टन प्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम एफ आर पी ची उर्वरित रक्कम वर्ग करण्यात आली आहे. सदरची अंतिम एफ आर पी ची उर्वरित रक्कम कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेतून घेऊन जावी
असे आवाहन कारखान्यातर्फे संचालक मंडळाने केले आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून अंतिम एफ आर पी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा
