९ महिन्यात औसा मतदारसंघातील विकासकामांसाठी साडेचारशे कोटींचा निधी – आ. अभिमन्यू पवार
औसा – राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या मागणीवरून नऊ महिन्यात मतदारसंघातील विकास कामांसाठी तब्बल साडेचारशे कोटींचा निधी दिला यातून मतदारसंघातील प्रत्येक गावाला पक्ष, गटतट किंवा जात, धर्म व पंत न पाहाता समसमान निधी वाटप केला आहे.शेतकऱ्यांच्या दुष्टीने मतदारसंघात झालेल्या कामातून औशाची ओळख संपुर्ण महाराष्ट्रात झाल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारार्थ (दि.२६)रोजी औसा तालुक्यातील भादा येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भादा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांना काठी, घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमाशंकर राचट्टे, उपसरपंच बालाजी शिंदे , पंचायत समिती माजी सदस्य पद्माकर चिंचोलकर , तंटामुक्त अध्यक्ष सुर्यकांत पाटील , हनुमंत दरेकर , सुरेश लटूरे , नंदकुमार जाधव, रेवणसिध्द पाटील, योगेश लटूरे आदी उपस्थित होते.सत्तेतील आमदार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असल्यास त्याचा मतदारसंघातील विकासावर काय सकारात्मक परिणाम पडतो याचा प्रत्यय औसा मतदारसंघातील जनतेला या ९ महिन्यात आला असून शेत तिथे रस्ता या अभियानातून संपूर्ण राज्यात औसा मतदारसंघाची ओळख निर्माण करणारे आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्यात एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे पाठपुरावा करून केवळ ९ महिन्यात तब्बल ४५० कोटींचा निधी मंजूर आणला आहे. या निधीतून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे केली जात असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामालाही यामुळे गती मिळत आहे. भादा येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल व्हावा यासाठी शेत रस्ते, वीज व पाणी यावर त्यांनी काम करण्याचा संकल्प घेत मतदारसंघात तब्बल तेराशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत.तर शेतकऱ्यांना उच्च दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी मतदारसंघात नव्याने काही वीज उपकेंद्राची निर्मिती केली जात आहे. तर शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी फळबाग लागवड, शेततळे आदी योजनेच्या माध्यमातून शेतीविकासाला गती देण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण योजना राबवित असताना औसा येथील बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व कामे केली जातील यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.