• Wed. Apr 30th, 2025

गारपीट व मुसळधार पावसाचे थैमान; तीन जनावरे ठार, शेकडो फळबागा उद्ध्वस्त

Byjantaadmin

Apr 27, 2023

वर्धा : आज, गुरुवारी पहाटेपासून झालेल्या मुसळधार पावसात फळबागांना मोठा फटका  बसला. देवळी तालुक्यात एक म्हैस तसेच समुद्रपूर तालुक्यात दोन बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडले. देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील सुभाष गामे यांच्या घराचे टिनाचे छत उडून गेले. गोठ्यांचे नुकसान झाले. गावात लिंबाएवढ्या गारांचा खच पडला. गावकरी या प्रकोपने हादरून गेले आहेत. हिंगणघाट येथे सर्वाधिक ३५ मिमी पाऊस पडला, तर कानदगाव मंडळात ४९ मिमी अशी विक्रमी पर्जन्यमान झाले आहे. आष्टी, आर्वी, कारंजा येथील संत्रा तर सेलू तालुक्यात पपई बाग उद्ध्वस्त झाली आहे. आर्वी,सेलू,वर्धा येथील फुलशेतीचे पण मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Hail and heavy rain;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed