संभाजी तारे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड
निलंगा:-युवा नेते भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासंग्रामचे तालुकाध्यक्ष संभाजी तारे यांची भाजपा निलंगा तालुकाउपाध्यक्षपदी निवड केली आहे.
माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब व युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विस्वास ठेवून मराठा महासंग्रामचे निलंगा तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संभाजी तारे याना भारतीय जनता पार्टीच्या निलंगा तालुकाउपाध्यक्ष म्हणून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी नवीन जबाबदारी देत ही निवड केली आहे.
यावेळी कासार शिरसी गटातील दयानंद मुळे,रामकिशन सावंत,लालासाहेब देशमुख,दयानंद जाधव,गोविंद तारे,बंकट बोरफळे,बळीराम तारे,भागवत गायकवाड,लक्ष्मण सुर्यवंशी,शिवाजी कळसेकर,बंकट कांबळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते