भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे मुख्यनेते भास्कर जाधवही उपस्थित होते.

महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून ठाकरे गटाला मोठे खिंडार पडत गेले. उद्धव ठाकरे यांची मागच्या 9 महिन्यात बऱ्याच जणांनी साथ सोडली. परंतु त्यांच्याबद्दल असलेल्या सहानभुतीमुळे अनेकजण आता पक्षप्रवेश करत आहेत. दरम्यान आज (दि.26) केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील समर्थकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजपला ठाण्यात मोठी खिंडार पडली आहे.

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केल्याने भाजपला ठाण्यात मोठी खिंडार पडली आहे.

शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सर्वसमावेशक विचारांवर विश्वास ठेवत भाजप युवा मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला.

उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे मुख्यनेते भास्कर जाधवही उपस्थित होते.

यावेळी भाजप युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस शशांक गुरुनाथ हरड, शहापूर तालुका उपाध्यक्ष तेजस पडवळ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद निचिते, ग्रामपंचायत खरीवली सरपंच नीता वातेस, उपसरपंच शिवानी शशांक हरड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आणि समर्थकांसह शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला.