ए झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र महाविद्यालय मुलींचा संघ विजयी
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मुलिंच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ए झोन आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन विविध क्रिडा स्पर्धा विभागवार पध्दतीने चालू आहेत. ए झोन अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या कबड्डी क्रिडा स्पर्धेचे लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ९ महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. या सर्व संघांमधुन महाराष्ट्र महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. या संघातील कु. धुमाळ शीतल, कु. अपसिंगेकर वसुंधरा, कु. माडीबोने निशा, कु. दिपाली सोळुंके, कु. पुजारी श्रुती, कु. नारायणकर निशा यांनी विशेष खेळ केला.
याचवेळी मुलांच्या संघाचेही सामने आयोजीत करण्यात आले होते. यामध्ये एकुण ११ संघ सहभागी झाले होते. यातही महाराष्ट्र महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने तृतीय स्थान पटकावले. मुलांच्या संघामध्ये कृष्णा कांबळे, रोमान तांबोळी, होळकर वैभव यांनी विशेष कामगीरी केली.
महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या या यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, शिक्षण समितीचे सचिव . बब्रुवान सरतापे, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांनी विशेष कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रिडा संचालक डॉ. गोपाळ मोघे यांचे मार्गदर्शन लाभले.