लातूर शहरातील बिईग ह्युमॅन शोरूमचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी) राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
हस्ते शुक्रवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील हत्ते नगर कॉर्नर या ठिकाणी महाराष्ट्रातील स्वतंत्र आणि लातूर मधील पहिल्या बिईग ह्युमॅन शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. आशिष राठी, अमित राठी, आणि गौरव बाहेती यांच्या कडून या शोरूमची सुरुवात करण्यात आली आहे . यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बिईग ह्युमॅन शोरूमची पाहणी करून शोरूमचे राठी व बाहेती कुटुंबीयांना व्यवसायातील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सी.ए.प्रकाश कासट, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, गणेश एस.आर.देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाचेपदाधिकारी उपस्थित होते.