• Tue. May 6th, 2025

पुण्यातील गुंड शरद मोहोळची पत्नी भाजपात, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

Byjantaadmin

Apr 20, 2023

पुणे : पुण्यात आगामी काही दिवसांत मोठा राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. तर महापालिकेच्या निवडणुका देखील काहीच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच अनुषंगाने पुण्यात भाजपमध्ये मोठे प्रवेश सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बडे नेते शाम देशपांडे यांचा भाजपात प्रवेश झाला होता. यातच आज सर्वात मोठी घडामोड घडली. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Pune Sharad Mohol Wife Swati Mohol Joins BJP Chandrakant Patil

ऑक्टोबर २०२१ मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली होती. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला होता. यात स्वाती मोहोळ यांचा देखील सहभाग होता. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली होती. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. पासेस वगैरे नव्हते, असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज त्याच हातांनी चंद्रकांत पाटील यांनी स्वाती मोहोळ यांना कमळ सोपवले आहे. स्वाती मोहोळ यांच्या प्रवेशानंतर आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी आहेत. शरद मोहोळ विरोधात पुणे, पिंपरी चिंचवड, आणि पुणे ग्रामीण परिसरात गुन्हे दाखल आहेत. शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी आहे. कातिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता. त्याच शरद मोहोळच्या पत्नीचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला आहे

नव्याने प्रवेश करणाऱ्यांच्या मनात एक भीती असते की आपल्या पक्षात स्थान मिळेल का? उचित सन्मान मिळेल का? फक्त प्रवेश मिळेपर्यंत मागे लागतील, नंतर कोपऱ्यात फेकून देतील, मात्र हा पक्ष येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करणारा आहे. स्वाती मोहोळ यांचं कर्तृत्व पाहून पक्ष चांगली जबाबदारी देईल, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *