राज्यात उष्णतेचा कहर सुरु असून उष्णतेच्या लाटेने (Heat Wave) जनजीवन प्रभावित झालं आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणं अवघड बनलं आहे. त्यात आता पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार आहे असा इशारा हवामान खात्यानं (Meteorological Department) दिलाय. राज्यातील अनेक भागात पारा चाळीशी पार गेला असून विदर्भापेक्षा ठाणे जिल्हाच अधिक तापलाय. मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील कर्जतमध्ये सर्वाधिक 45 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मुरबाड तालुक्यातही 44 अंश तापमान नोंदवण्यात आलंय. विदर्भात चंद्रपुरात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली असून पारा 43 अंशावर गेलाय. (Highest temperature ever recorded in Thane)
राज्य सरकारला आली जाग
दरम्यान, झी 24 तासच्या भूमिकेनंतर राज्य सरकारला जाग आली आहे. आता दुपारी 12 ते 5 या दरम्यान कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्य सरकार तसा अध्यादेश (Ordinance) काढणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढांनी (Mangal Prabhat Lodha) दिली आहे. उष्माघातामुळे (Heat Stroke) महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमानंतर 14 बळी गेले. अशी दुर्दैवी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी सरकारनं यापुढे सकाळी 10 ते 5 यावेळेत खुल्या मैदानावरच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी. 15 जूनपर्यंत असे खुल्या मैदानातले कार्यक्रम या वेळेत घेऊ नयेत, अशी भूमिका झी 24 तासनं घेतली. झी 24 तासच्या याच भूमिकेनंतर जागं झालेलं राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे,