स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Vee Savarkar) माफी मागितल्याशिवाय काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, भाजपने अशा रिकाम्या गोष्टी करू नये, राहुल गांधींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, म्हणणाऱ्यांचे पायच आम्ही शिल्लक ठेवणार नाही, अशा शब्दात दानवे यांनी भाजपला दम भरला आहे.
महाराष्ट्रच काय या देशातील सामान्य नागरिकसुद्धा कुठल्याही राज्यात जावू शकतो, घटनेने दिलेला हा अधिकार असल्याची आठवण देखील दानवे यांनी करून दिली. rahul gandhi यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. bjp वीर सावरकारांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितल्याशिवाय राहुल गांधी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
या संदर्भात माध्यमांशी बोलतांना दानवे म्हणाले, भाजपने लक्षात घ्यावं ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अन् ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी असतात. bawankule कुणी कुणाला येऊ देऊ द्यावं, कुणाला अडवावं , या रिकाम्या गोष्टी भाजपने करू नये. हिंदुस्थानात कुणीही कुठेही जाऊ शकतं.