|
|
रूपये २००/- प्रती टनाप्रमाणे दुसरा हप्ता बँक खात्यात वर्ग
लातूर प्रतिनिधी: सोमवार,दि. १० एप्रिल २०२३
विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळी, ता. जि. लातूर या
कारखान्यास गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये पुरवठा केलेल्या ऊसास एफ.आर.पी.पोटी
दुसरा हप्ता रूपये २००/- प्रती मे.टन प्रमाणे संबंधीत ऊस पुरवठा दाराच्या
बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये विलास साखर कारखान्याने ५,७३,३१७.६९९ मे.टन
ऊसाचे गाळप केले असून गाळप झालेल्या ऊसास एफ.आर.पी. पोटी पहिला हप्ता
रू.२२००/- प्रती टन प्रमाणे ऊस गाळपास आल्यानंतर प्रती (१०) दहा दिवसास
यापुर्वी अदा केला आहे.
एफ.आर.पी.पोटी दुसरा हप्ता रूपये २००/- प्रती मे. टन प्रमाणे संबंधीत
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तसेच
हंगामाचा सरासरी साखर उतारा निश्चित झाल्यानंतर अंतिम होणाऱ्या साखर
उताऱ्या नुसार ऊस दर अदा केला जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हा.
चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.
आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार
महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन, माजी
मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज
विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली
विलास सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दर अदा करण्याची परंपरा
निर्माण केली आहे.
गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये पुरवठा केलेल्या ऊसास एफ.आर.पी.पोटी दुसरा
हप्ता रूपये २००/- प्रती मे. टन प्रमाणे अदा केल्यामुळे सभासद, ऊस
उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
—––————————