महिलांसाठी कर्करोग तपासणी व निदान शिबीर संपन्न बदलत जिवनमान यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी-चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी मंगळवार ११ ऑक्टोंबर २२:
सदयाच्या काळात बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे विशेषता स्त्रियांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी मातांनी जागृत होवून चांगले आरोग्य ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, आवश्यक तपासणी वेळेवर करावीत, आवश्यकते प्रमाणे योग्य ते उपचार वेळेवर घ्यावेत, असे विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे. ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव येथे महिलांसाठी स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग तपासणी व निदान शिबीर मंगळवार दि. ११ आक्टोंबर २०२२ रोजी संजीवनी अभियानाअंतर्गत कर्करोग मुक्त जिवन अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यालय लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूर तसेच, स्त्रीरोग संघटना लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव येथे कर्करोग तपासणी व निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन विलास सहकारी साखर कारखाना लि. च्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता सुधीर देशमुख,डॉ जिल्हा आरोग्य अधिकारी हणमंत वडगावे, लातूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख, डॉ स्त्रीरोग संघटना अध्यक्ष वैशाली दाताळ, स्त्रीरोग संघटना सचिव डॉ.रत्ना जाजु, तसेच ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी पूढे बोलतांना चेअरमन वैशाली विलासराव देशमुख म्हणाल्या सर्व स्त्रीयांनी व मातांनी आपल्या आरोग्याची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी व सर्व तपासण्या वेळीच कराव्यात व योग्य ते उपचार त्वरीत घ्यावेत. कर्करोग उपचारासाठी अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम महत्वाचे आहेत यामुळे कर्करोगा उपचारा सोबत जागृती देखील होईल असे वैशाली विलासराव देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी, लातूर पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर जिल्हयात आतापर्यंत एकुण ०३ ते ३.५ लाख लाभार्थ्यांची कर्करोग विषयी तपासणी संपन्न झाल्याचे सांगितले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर अभिनव गोयल यांनी निदान झालेल्या महिलेचे शेवटपर्यंत उपचार करण्यात येतील असे सांगितले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, लातूर, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी याकामी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुर्णपणे सहकार्य करेल असे सांगितले. हणमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून ही कामाची सुरूवात असून अशा प्रकारची शिबीरे पूर्ण जिल्हयात राबविण्यात येतील असे सांगितले. या कर्करोग तपासणी व निदान शिबीर यशस्वी करण्यासाठी ग्रामिण रूग्णालय बाभळगाव येथील अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र भांतागळी, बोरी, गंगापूर येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, स्त्रीरोग संघटनाचे पदाधिकारी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाचे डॉक्टर्स, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबीरात ४२७ जणांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. जतिन जैस्वाल यांनी केले, प्रस्तावना डॉ. वैशाली दाताळ यांनी तर आभार डॉ. मोनिका पाटील यांनी मानले.